Breaking Corona enters the city of Karmala 
सोलापूर

ब्रेकिंग : करमाळा शहरात कोरोनाचा प्रवेश 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील एका 25 वर्षीय तरूणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत करमाळा तालुक्‍यात कोरोनाबाधित आढळले होत. मात्र करमाळा शहरात कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नव्हाता. मात्र, आज कोरोनाने शहरात प्रवेश केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (ता. 13) हा अहवाल मिळाला असून या रुग्णांच्या सहवासात आलेल्या 33 लोकांना क्वारंटाइन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे. 
करमाळा शहरात पहिल्यांदाच कोरोनाचा रूग्ण आढळून आल्याने शहरात सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. आतापर्यंत तालुक्‍यातील जिंती येथे मोठ्याप्रमाणावर कोरोना रूग्ण आढळत आहे. मात्र आज शहरातही बाधित रूग्ण आढळून आला आहे. करमाळा शहरातील सिध्दार्थनगरमधील एका रूग्णास ता. 5 पासून ताप, सर्दी, खोकला या त्रास होत होता. यासाठी त्यांने प्राथमिक उपचार घेतले होते. आजारी पडल्यानंतर संबंधित रूग्णांने शहरातील मेनरोडवरील एका खाजगी रूग्णालयात उपचार घेतला आहे. त्यामुळे हे रूग्णालयही बंद ठेवण्यात आले असून डॉक्‍टर व कर्मचारी यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. हॉस्पीटलमध्ये या कालावधीत उपचारासाठी गेलेल्या रूग्णांची यादी ताब्यात घेण्यात आली आहे. ग्रामीण भागातून या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांचा शोध घेण्याचे काम संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक करत आहे. याशिवाय संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या महापुरात महाराष्ट्रातील ११० हून अधिक पर्यटक अडकले; मुंबईतील डॉक्टर दाम्पत्याशीही संपर्क तुटला..

Sugar Rates: ६४०० रुपयांवर गेलेली साखर अचानक ४८०० वर! नेमकं आठवडाभरात काय घडलं?

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार! ३९२ जणांचा मृत्यू, १५०० बेपत्ता; २९० भारतीयांशी संपर्क तुटला

आजचे राशिभविष्य - 28 ऑगस्ट 2026

Narali Bhat: नारळी भात तर प्रत्येकाच्या घरी बनतो! पण ‘या’ रेसिपीची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भुरळ पाडेल

SCROLL FOR NEXT