

Nepal Flood Crisis Over 110 Tourists From Maharashtra Stranded As Mumbai Doctor Couple Goes Missing Rescue Efforts Underway
sakal
मुंबई: नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या महापुरात राज्यातील ११० पेक्षा जास्त पर्यटक अडकले असल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. दरम्यान, नेपाळमधील महापुरात जे लोक मृत झाले, त्यांच्या प्रती आपल्या सहवेदना असून तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.