lockdown-abd-11_202005422361.jpg 
सोलापूर

Breaking ! जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची होणार तपासणी; मास्क नसल्यास परवाना होणार निलंबित 

तात्या लांडगे

सोलापूर : शहर- जिल्ह्यातील कोरोना वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज (शुक्रवारी) सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात येणारी सर्वच प्रवासी वाहने पोलिसांनी तपासावीत, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

आदेशातील ठळक बाबी... 

  • सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची होणार तपासणी 
  • वाहनचालक तथा वाहनातील व्यक्‍तींकडे मास्क अथवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास एक हजारांचा होणार दंड 
  • दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास दोन हजारांचा दंड करण्याचे आदेश 
  • दंड होऊनही नियम मोडल्यास सात दिवस वाहन होणार जप्त 
  • दुसऱ्यांदा नियम मोडणाऱ्या वाहनचालकाचा परवाना निलंबनाचेही दिले आदेश 
  • वाहनात अतिरिक्‍त प्रवासी असल्यास प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड 


जिल्ह्यात प्रवेश करताना अथवा जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हवालदार, पोलिस नाईक, पोलिस शिपाई, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले आहेत. दरम्यान, कारवाई करताना वाहनातील व्यक्‍तीकडे मास्क नसल्यास त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड करावा, अशा सूचनाही आदेशातून जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. एकदा दंड भरुनही त्या वाहनचालकाने नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचे वाहन सात दिवसांसाठी जप्त केले जाणार आहे. तर वाहनचालकाचा परवानादेखील निलंबित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करणाऱ्या पोलिस व आरटीओ अधिकाऱ्यांना दिला आहे. तीनचाकी वाहनात तीन तर चारचाकीत चार (चालकासह) प्रवासी असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय वाढीव प्रवासी असल्यास प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे दंड केला जाणार आहे. या आदेशानुसार तत्काळ कार्यवाही सुरु करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, तीन व चारचाकी वाहनचालकांसाठी दंडाची रक्‍कम पाचशे रुपये असून दुसऱ्यांदा तसा प्रकार केल्यास एक हजारांचा दंड केला जाईल, असेही ओदशात नमूद करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

Navi Mumbai : नवी मुंबईच्या वाशी मनपा रुग्णालयातील घटना; प्रसूतीदरम्यान नवजात बाळ मृत आढळल्याने नातेवाईकांचा संताप

SCROLL FOR NEXT