solapur bus stand sakal
सोलापूर

सोलापूर बस स्थानक परिसरात अंधारात थांबतात बस! स्थानकावर चौकी, पण पुरेसे पोलिस नाहीत; एवढ्या मोठ्या बस स्थानकावर अवघे ४ सुरक्षारक्षक

सोलापूरच्या मुख्य बसस्थानक परिसरात पुरेसा उजेड नाही, पोलिस चौकी आहे पण एक किंवा दोनच कर्मचारी तेथे असतात. दुसरीकडे बसस्थानकातून यांत्रिकी विभागाकडे जाणाऱ्या रोडवर पूर्णपणे अंधार असून त्याठिकाणी रस्त्यालगत बंद बसगाड्या उभ्या दिसतात, असे चित्र आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : स्वारगेट बसस्थानकावरील बंद बसगाडीत एका व्यक्तीने महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व विभागीय नियंत्रक, आगार व्यवस्थापकांना प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सक्त सूचना केल्या आहेत. पण, सोलापूरच्या मुख्य बसस्थानक परिसरात पुरेसा उजेड नाही, पोलिस चौकी आहे पण एक किंवा दोनच कर्मचारी तेथे असतात. दुसरीकडे बसस्थानकातून यांत्रिकी विभागाकडे जाणाऱ्या रोडवर पूर्णपणे अंधार असून त्याठिकाणी रस्त्यालगत बंद बसगाड्या उभ्या दिसतात, असे चित्र आहे.

सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुख्य बसस्थानक परिसर आहे. या बस स्थानकावर दररोज सुमारे २०० गाड्या ये-जा करतात. तेथून दररोज किमान १५ हजार प्रवासी विविध प्रवास करतात. पण, अनेकदा बसमध्ये चढताना प्रवाशांचे दागिने लंपास झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पुरेसे दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे देखील बस स्थानकाच्या आवारात नाहीत.

बुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास स्थानकावर जाऊन पाहणी केली असता, त्याठिकाणी लाईटचा पुरेसा उजेड दिसून येत नाही. पोलिस चौकीत कर्मचारी नव्हता, सोलापूर विभागाकडील सुरक्षारक्षक (गार्ड) दिसले, पण त्यांची संख्या खूपच अत्यल्प असल्याचे जाणवले. एकूणच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी लाईटची सोय करावी, दर्जेदार सीसीटीव्ही लावावेत, स्थानकाच्या आवारात बंद बसगाड्या उभा करू नयेत, उभा असतील तर त्याठिकाणी जाऊन सतत पाहणी करावी, अशा मागण्या प्रवाशांकडून होत आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चार सुरक्षारक्षक

सोलापूर बसस्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चार गार्ड (सुरक्षारक्षक) नेमले आहेत. मुख्य प्रवेशद्वार परिसरात दोन आणि आतमध्ये दोघे असतात. त्यांची ड्यूटी २४ तास असते. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणखी उपाययोजना करण्याचे नियोजन आहे.

- अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT