Central Team
Central Team 
सोलापूर

केंद्रीय पथकाची मोहोळ तालुक्‍यातील नुकसानीची पाहणी ! शेतकऱ्यांनी मांडली वस्तुस्थिती

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यात आक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय दोन सदस्यीय पथकाने मंगळवारी केली. त्यांनी नुकसानी संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

14 व 15 ऑक्‍टोबर रोजी मोहोळ तालुक्‍यात अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सुमारे 800 जनावरे वाहून गेली, ऊस, केळी, मका या पिकांसह डाळिंब, पेरू, द्राक्ष या फळबागांचेही नुकसान झाले. अनेक जमिनी खरडून गेल्या. मोटारी, पाइपलाइन व घरे वाहून गेली. तहसीलदार जीवन बनसोडे यांनी तातडीने पंचनामे करून शासनाकडे नुकसान भरपाईचा आराखडा पाठविला. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 21 कोटी रुपये तालुक्‍याला मिळाले. 

मंगळवारी सकाळी केंद्रीय पाहणी पथक मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे आले. त्यांनी तेथील तात्या चंदनशिवे यांच्या पूर्ण आडवा झालेल्या उसाची पाहणी केली व त्यांच्याशी संवाद साधला. कोळगाव येथे बंधाऱ्यावरूनच सतीश देशमुख व पांडुरंग देशमुख यांच्या शेतीची पाहणी केली. त्या ठिकाणी महावितरणचे पडलेले खांब उभे करण्याचे काम सुरू होते. तसेच खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. 

दुपारी साडेबारा वाजता पथक पेनूर येथील फुलाबाई सुखदेव माने, विजयाराणी सुरेश चव्हाण, भारत दत्तात्रय सलगर यांच्या शेताकडे गेले. विजयाराणी चव्हाण यांच्या मका व इतर शेतीची पाहणी केली. भारत सलगर यांच्या केळी बागेची पाहणी केली. पाऊस कधी पडला, उत्पन्न काय निघाले का नाही, शेतात पाणी किती दिवस होते, असे प्रश्न पथकाने शेतकऱ्यांना विचारले. त्यावर फुलाबाई माने यांचे चिरंजीव कैलास माने यांनी पिकात दीड महिना पाणी असल्याचे सांगितले. सलगर यांच्याशीही संवाद साधला. मागील उत्पन्न किती आले होते, नुकसान व खर्च वजा जाता हातात काय राहिले काय, असे प्रश्न पथकाने विचारले. मात्र शेतकऱ्यांनीही धीटपणे वस्तुस्थिती सांगितली. 

या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांत अधिकारी सचिन ढोले, तहसीलदार जीवन बनसोडे, वरिष्ठ लिपिक अमित कलेटवाड, जिल्ह्यातील सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी हातात फायली घेऊन सज्ज होते. पेनूर येथे माजी उपसभापती मानाजी माने, माजी सरपंच रमेश माने, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख चरणराज चवरे हे उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT