Chicken 
सोलापूर

चिकन खातेय 240 रुपये किलो भाव ! काय आहेत दरवाढीची कारणे? वाचा सविस्तर

मिलिंद गिरमे

लवंग (सोलापूर) : कोरोना महामारी व मध्यंतरी बर्ड फ्लू रोगामुळे चिकनचे दर कमी झाले होते. मिळेल त्या दरात चिकनची व जिवंत पक्ष्यांची विक्री होत होती. मात्र आता चिकनच्या दराने बघता बघता दोनशेचा टप्पा पार केला असून, सध्या चिकन 220 ते 240 रुपये किलो दराने विकले जात आहे. याचे कारण बॉयलर कोंबड्यांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडे चिकनचे दर वधारले आहेत. 

कोरोनाच्या भीतीमुळे कोंबड्यांना दर राहील की नाही, या भीतीमुळे पोल्ट्री धारकांकडून कोंबड्यांचे कमी उत्पादन घेतल्याच्या परिणामामुळे चिकनचे दर भडकले आहेत. त्याच्या जोडीला जानेवारी महिन्यात आलेल्या बर्ड फ्लू रोगामुळे चिकनची पुरवठा साखळी विस्कळित होऊन घाऊक बाजारात कोंबड्यांची आवक घटल्याने दरात वाढ झाली आहे. 

साधारणपणे एक - दीड महिन्यापूर्वी किरकोळ स्वरूपात चिकन विक्रीचा दर 160 रुपये किलो होता. तर 15 - 20 दिवसांपूर्वी 180 रुपयांपर्यंत हा दर पोचला होता. सध्या तर आठवडाभरापासून हा दर वाढून 220 रुपयांपर्यंत पोचला आहे. कोंबड्यांची कमतरता राहिल्यास आणखी दर वाढतील, अशी शक्‍यता आयुब पठाण या चिकन विक्रेत्याने व्यक्त केली आहे. 

सध्या घाऊक बाजारात मागणी वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांना 130 रुपये किलो याप्रमाणे कोंबड्या विकत घ्याव्या लागत आहेत. त्यातून सध्या 220 रुपयांपर्यंत चिकनचे दर गेले आहेत. सद्य:स्थितीत बाजारात मागणीपेक्षा पुरवठा 10 ते 15 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. परिणामी चिकनच्या दरात वाढ होत आहे. 

पोल्ट्री व्यवसायातील स्थित्यंतरे 

  • करोनाच्या साथीमुळे पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका 
  • त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या सुमारास चिकनचे दर काहीसे वाढले 
  • त्यानंतर जानेवारीत आलेल्या बर्ड फ्लू रोगाच्या साथीने पोल्ट्री व्यावसायिकांकडील कोंबड्या विकल्या न गेल्याने पुन्हा चिकनची मागणी घटली 
  • बर्ड फ्लूच्या धास्तीने अनेकांनी पोल्ट्रीमध्ये नवीन पिल्ले आणली नाहीत. पर्यायाने पोल्ट्री उत्पादनाच्या साखळीत खंड पडला 
  • कडक उन्हाळ्यामुळे कोंबड्यांची मर वाढून वाढही कमी होते, त्यामुळेही पुरवठा कमी झाला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT