सोलापूर

ठिणगी....! खासदार महास्वामींवरून काॅंग्रेसमध्ये मतभेद 

विजयकुमार सोनवणे


सोलापूर :  खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने सोमवारी अवैध ठरवले. त्याचे स्वागत करत उत्तर सोलापूर तालुका कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त करीत कॉंग्रेस भवनसमोर जल्लोष केला. मात्र त्यास पक्षांतर्गत मतभेदाची ठिणगी पडली.

डॉ. महास्वामी यांच्या जातीचा दाखला अवैध ठरल्याचे समजल्यावर तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. सिद्राम सलवदे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस भवनसमोर पेढे वाटून तसेच फटाक्‍यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष एन. के. क्षीरसागर, अशोक लांबतुरे, माजी नगरसेवक हारूण शेख, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, सोपान थोरात, मुन्ना कोडले, इम्तीयाज बेलीफ, अजिनाथ कांबळे, उमाकांत येरवडे, विनोद रणशुरे, भगवान साखरे, महेश जावळे, सूर्यकांत व्हनकडे, उत्तमकुमार वाघमारे, बाळासाहेब नवगिरे, कुंडलिक जाधव, बलभीम कांबळे, आकाश राठोड उपस्थित होते. 

जल्लोषाचा कार्यक्रम सुरु असताना कॉंग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांपैकी कुणीही उपस्थित नव्हते. या संदर्भात कानोसा घेतला असता, जल्लोषाला शहर पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याचे सांगण्यात आले. डॉ. सलवदे म्हणाले,""भाजपने स्वतःच्या स्वार्थासाठी जयसिद्धेश्‍वर महास्वामींनी अडचणीत आणले आहे. जातीचा बोगस दाखला काढायला लावून निवडणूक लढवायला भाग पाडले. आता जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांची गोची झाली आहे.'' या प्रकाराबाबत शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी प्रतिक्रिया दिली नाही. 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT