satta mataka frud
satta mataka frud sakal
सोलापूर

सोलापूर : बंद झालेला मटका शहरात पुन्हा जोमात

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महापालिकेच्या लोकप्रतिनिधीवर तत्कालीन पोलिस आयुक्‍तांनी कारवाई करत शहरातील मटक्‍यावर ‘अंकुश’लावला होता. पण, त्यावेळच्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर शहरात पुन्हा मटका खुलेआम सुरू झाल्याचे चित्र असून, पोलिस कारवायांतून ते सिद्ध झाले आहे. गुन्हे शाखेतील एका पोलिसाचे स्टिंग ऑपरेशन झाल्यानंतर शहरात मटक्‍यावर कडक कारवाई सुरू झाली. पण, अजूनही मटका तथा जुगार पूर्णपणे बंद झालेला नाही.

पोलिस आयुक्‍तांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच विशेष पथकाची नियुक्‍ती करत शहरातील गुन्हेगारी रोखण्याचा नवा प्रयत्न केला. पण, स्थानिक पोलिस आणि पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्हे प्रकटीकरण पथक आणि गुन्हे शाखा असतानाही त्या पथकाची नियुक्‍ती केल्याने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच अविश्‍वास दाखविल्याची चर्चा झाली. तरीही, चांगले काम करताना टीका होतच असते म्हणून पोलिस आयुक्‍तांनी त्याकडे लक्ष दिले नाही. विशेष पथकानेही चांगली कामगिरी केली आहे. पण, शहरातील

बंद घरामध्ये चोरी, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे प्रकार, दुचाकी चोरी, मटका, जुगार खेळणे असे प्रकार थांबलेले नाहीत. पोलिसांच्या अथक प्रयत्नांतून घडलेला गुन्हा उघड होऊन गुन्हेगाराला शासन होतेच; पण गुन्हे होऊ नयेत म्हणून ठोस प्रयत्न करावे लागतात, ते होताना दिसत नाहीत.

दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी (ता. २६) तीन ठिकाणी कारवाई करत मटका खेळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले. तर जेलरोड पोलिसांनीही साईबाबा चौक परिसरात मटका खेळणाऱ्याविरुद्ध कारवाई करून गुरुनाथ लक्ष्मण काशेट्टी, विठ्ठल भास्कर जाधव यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. पण, बंद झालेला मटका पुन्हा सुरू होतोय, त्यामुळे पोलिसांनी त्याचा सूत्रधार कोण, याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे जाणकारांचे मत आहे.

इस्माईल मुच्छालेला पाठबळ कोणाचे?

एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी तीन ठिकाणी मटका खेळणाऱ्यांवर कारवाई केली. त्या तिन्ही कारवायांत इस्माईल मुच्छालेचे नाव आहे. यापूर्वीही अशाच कारवायांत त्याचे नाव आले आहे. मुच्छालेवर कारवाई होऊनही त्याने हा अवैध व्यवसाय सोडलेला नाही. त्यामुळे त्याला नेमके कोणाचे पाठबळ आहे, त्याला वरदहस्त कोणाचा, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील विनायक नगरात नागनाथ मंदिराच्या भिंतीजवळील मोकळ्या जागेत, अक्‍कलकोट रोडवरील अभिषेक नगरातील लक्ष्मी मंदिराजवळील रोडवर, जुना अक्‍कलकोट नाका येथील खैरादी नगरात कारवाई केली. त्यात पोलिसांनी मुच्छालेसह सिद्धाराम संगणबसप्पा गोब्बी, सचिन सैदप्पा कोळी, मल्लिनाथ रामचंद्र जाधव यांच्यावरही गुन्हे दाखल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT