superintendent of police tejaswi satpute esakal
सोलापूर

सोलापूर पोलिसांची ‘सीएमआयएस’ प्रणाली! एका क्लिकवर समजणार गुन्हेगारांची कुंडली

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी बनविलेल्या ‘सीएमआयएस’ प्रणालीमुळे कोणत्याही क्षणी संशयित आरोपीचा केवळ फोटो घेऊन अपलोड केल्यास त्याची संपूर्ण पार्श्वभूमीच समोर येते. त्यामुळे अनेक गुन्ह्यांमधील आरोपींचा शोध घेणे सोयीस्कर झाले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा व फसवणूक अशा गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या आरोपींची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी पोलिसांना अनेक पोलिस ठाण्यांना पत्रव्यवहार करावा लागतो. त्यात खूप वेळ जातो व कागदपत्रांची जुळवाजुळवही करावी लागते. पण, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी बनविलेल्या ‘सीएमआयएस’ प्रणालीमुळे कोणत्याही क्षणी संशयित आरोपीचा केवळ फोटो घेऊन अपलोड केल्यास त्याची संपूर्ण पार्श्वभूमीच समोर येते. त्यामुळे अनेक गुन्ह्यांमधील आरोपींचा शोध घेणे सोयीस्कर झाले आहे.

राज्यातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचाही समावेश आहे. आरोपींचा शोध लागत नसल्याने अनेक गुन्हे वर्षानुवर्षे तसेच पडून राहतात. या पार्श्वभूमीवर ठोस उपाय म्हणून सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली सीएमआयएस (criminal monitoring intelligent system) ही प्रणाली विकसित केली आहे. कोणत्याही क्षणी समोरील व्यक्ती संशयित वाटल्यास, प्रश्नांची उत्तरे देताना खोटी अथवा उडवाउडवीची माहिती देत असल्यास त्याचा फोटो या प्रणालीवर अपलोड केल्यास अवघ्या ३० सेकंदांत त्याची पार्श्वभूमी स्पष्ट होते. सध्या ही प्रणाली सोलापूरसह नगर, औरंगाबाद, पुणे, सांगली, कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांतील पोलिस वापरत आहेत. प्रत्येक पोलिसाच्या ॲन्ड्रॉइड मोबाईलवर ही प्रणाली देण्यात आली असून, त्यांच्याकडून गैरवापर होऊ नये म्हणून जिल्ह्यासाठी स्वतंत्र पर्यवेक्षक नेमला गेला आहे. आय-मार्क टेक्नॉलॉजीचे संचालक मंगेश शितोळे यांनी पोलिसांच्या फायद्यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे.

‘सीएमआयएस’ची ठळक वैशिष्ट्ये...

  • बेवारस, गुन्ह्यात वापरलेले, अपघातग्रस्त वाहन कोणाचे ते तत्काळ शोधता येईल

  • संशयिताचा फोटो अपलोड केल्यास ३० सेकंदांत समजेल त्याचे पूर्वीचे रेकॉर्ड

  • शरीर किंवा मालाविषयक दोनपेक्षा अधिक गुन्हे नोंद असलेल्यांवर ठेवता येतो वॉच

  • सॉफ्टवेअरमधील प्रत्येक आरोपीच्या घराचे जीपीएस लोकेशन समजते

  • चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, फसवणूक करणाऱ्यांना पकडण्यासाठी होते मदत

  • रात्रगस्त किंवा नाकाबंदीवेळी फिरणाऱ्या संशयिताने नाव न सांगितल्यास फोटोवरून समजते त्याची पार्श्वभूमी

  • पोलिसांनी मोबाइल बदलल्यास प्रणाली त्यातून काम करणार नाही

संशयित गुन्हेगाराची पार्श्वभूमी तात्काळ समजेल

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारांचा तपास किंवा शोध घेण्यासाठी विलंब लागू नये, संशयिताच्या फोटोवरून त्याची पूर्वीची पार्श्वभूमीवर तत्काळ समजावी या हेतूने गुन्हेगारी देखरेख बुद्धिमान प्रणाली (सीएमआयएस) विकसित केली आहे. नाकाबंदी किंवा रात्रगस्तीवेळी त्याचा चांगला फायदा पोलिसांना होत आहे.

- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs UAE U19 : ६,६,६,६,४,४,४,४! वैभव सूर्यवंशी गरजला... युएईच्या गोलंदाजांना धु धु धूतला, झळकावली फिफ्टी

PG Medhe Passes Away : सहकारी साखर उद्योगातील नस असलेले पी. जी. मेढे यांचे निधन, राजू शेट्टींना व्यक्त केला शोक

Paush Amavasya 2025: पौष अमावस्या कधी आहे? जाणून घ्या 'या' दिवसाचे विशेष महत्त्व

Viral Video: मरता मरता वाचला भाऊ ...! स्कायडायव्हिंग करताना पॅराशूट विमानाच्या पंख्यात अडकलं अन् पुढं काय झालं पाहा Video

IND vs SA 2nd T20I: भारतीय गोलंदाजांचे वस्त्रहरण करणाऱ्या Quinton De Kock ने रचला इतिहास; नोंदवला जगात भारी विक्रम...

SCROLL FOR NEXT