Hospital Bill 
सोलापूर

कोरोना रुग्णांसाठी खुषखबर..! हॉस्पिटलने ज्यादा बिल दिल्यास आता करता येणार तक्रार... पण कुठे? हे वाचा 

तात्या लांडगे

सोलापूर : रुग्णांकडून भरमसाठ बिलांची वसुली केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने आता महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी बिलांची पडताळणी करण्यासाठी 14 ऑडिटरची नियुक्‍ती केली आहे. तसेच नऊ आरोग्य मित्रांचीही नियुक्‍ती केली आहे. शासनाच्या निकषांनुसार बिलांची आकारणी झाल्याची पडताळणी ऑडिटर करतील, तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोणता रुग्ण पात्र आहे, याची पडताळणी आरोग्यमित्र करतील. 

रुग्ण तथा रुग्णांच्या नातेवाइकांना हॉस्पिटलमधील कोव्हिड-19 च्या बेडची उपलब्धतता माहिती होण्यासाठी http://117.247.89.137:85 ही लिंक दिलेली आहे. 24 हॉस्पिटलमध्ये किती बेड्‌स शिल्लक आहेत आणि किती आयसीयू बेड्‌स उपलब्ध आहेत, किती व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत, याची माहिती त्यावर उपलब्ध होणार आहे. डी.सी.एस.च्या हॉस्पिटलमध्ये फक्त सिरिअस रुग्णांना उपचार घेता येणार आहे. कोव्हिड हॉस्पिटलमध्ये कोणताही रुग्ण आल्यानंतर त्याला दाखल करून घ्यावे. त्यानंतर प्राथमिक उपचार करून त्याला सी.सी.सी. सेंटरला रेफर करावयाचे आहे. झोपडपट्टी बाहेरील घर असल्यास त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला द्यावा. डी.सी.ए. आणि डी.सी.एस.सी. यांच्याकडे एकूण 940 बेड्‌स कोव्हिडसाठी उपलब्ध करण्यास महापालिका आयुक्‍तांनी परवानगी दिली आहे. 

याव्यतिरिक्त 107 नवीन बेड्‌स कोव्हिडसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच महापालिकेने बलवंत इन्स्टिट्यूट न्यूरॉलॉजी, लाईफ लाइन हॉस्पिटल व अपेक्‍स हॉस्पिटल असे तीन अतिरिक्त हॉस्पिटल कोव्हिडसाठी अधिग्रहित केले आहेत. तसेच धनराज गिरजी हॉस्पिटल, नर्मदा हॉस्पिटल व स्पर्श हॉस्पिटलमध्ये कोव्हिडसाठी बेड्‌स वाढविले आहेत. कोव्हिड बाबतीत तक्रारींसाठी 0217-2740341 व मोबाईल क्रमांक 9607943100 यावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Politics: कराडमध्ये नगरसेवकांचे शक्तिप्रदर्शन; आमदार अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित मतदान

तारिणी मालिकेतून 'या' अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली...

Smartphone Ban : 'या' देशात सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्मार्टफोन वापरावर बंदी, आदेश झुगारल्यास नोकरीला मुकावे लागणार, तुरुंगवासही होणार

Gokul Election Update : 'गोकुळ'च्या यादीतून ६२६ दूध संस्थांना डच्चू; ५ हजार ४७० पैकी ४ हजार ८४४ संस्थाच ठरल्या पात्र, नवी यादी जाहीर, आता कोणाचे बिघडणार गणित?

Crime News: वाळू माफियांचा रक्तरंजित हल्ला! फॉर्च्युनरमध्ये अडकवून भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT