Corona closes schools colleges rural students on farms 
सोलापूर

कोरोनामुळे शाळा, कॉलेज बंद; ग्रामीण विद्यार्थी शेतात दंग 

भीष्माचार्य ढवण

सासुरे (ता. बार्शी, ता. सोलापूर) : कोरोनामुळे शाळा व महाविद्यालये गेल्या चार महिन्यापासून बंद आहेत. बहुतांश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू असला तरी चालू शैक्षणिक वर्ष सुरळीत केव्हा सुरू होणार, हे अद्यापही गुलदस्त्याच आहे. अजूनही कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन आहेत. मात्र यातून शेती उद्योगाला मुभा असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी आपली पिढ्यांपिढ्याच्या उपजीविकेचे साधन असलेल्या शेतीच्या कामात दंग आहेत. 
लॉकडाउनमुळे शहरी मुलांना घरात कोंडून राहावे लागले. मात्र ग्रामीण भागात कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना शेतीमुळे विरंगुळा होत असला तरी यंदा वेळेत पावसाने हजेरी लावल्याने शेतात कामांची झुंबड उडाली आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या ऑनलाइन अभ्यासाचे तीनतेरा वाजले असले तरी विद्यार्थ्यांना प्रदिर्घ सुट्ट्या मिळाल्यामुळे ही मुले पालकांच्या कामात चांगलीच उपयोगी पडत आहेत. 
सध्या शेतात सर्वत्र दुबार पेरणी, तुटाळ भरुण काढणे, कोळपणी, फवारणी, तण वेचणे अशा कामांची झुंबड उडाल्याने आपल्या आईवडिलांना मदतीसाठी विद्यार्थी शेता सरसावले असून राबताना दिसत आहेत. शहरी मुलांच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन अभ्यासाची पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने ती अभ्यासात रमलीच नाहीत. त्यात रेंज, अँड्रॉइड मोबाईल, ई-लर्निंग सुविधा, लॅपटॉप, संगणक या साधनांऐवजी त्यांच्याकडे खोऱ्या, पाटी, टिकाव, तिफन अन्‌ जनावरं हीच साधनं दिसत आहेत. ऑनलाइनची पुरेशी साधनं नसल्याने ग्रामीण विद्यार्थी अभ्यासाऐवजी शेतातच गुंतलेला दिसत आहे. त्यामुळे शिक्षणातील शहरी व ग्रामीण दरी गडद होताना दिसत आहे. यावर शासन काय उपाययोजना करणार हे पाहणे गरजेचं आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : मनमाड रेल्वे स्थानकात माथेफिरूचा धुमाकूळ; प्रवाशांवर दगडफेक, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT