सोलापूर

यापुढे केश कर्तनासाठी या अटी

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोरोनाचा धोका पुढील काही महिने तरी कायम राहणार आहे. तेव्हा काम कसे करायचे, असा प्रश्‍न नाभिक कारागिरांना व मालकांना पडला आहे. सलूनमध्ये कारागिरांचा ग्राहकाशी थेट संपर्क येतो. येणाऱ्या ग्राहकांमध्ये कोण आजारी आहे हे कळत नाही. कुणी शिंकले, खोकले तरी व्यावसायिकांना, कारागिरांना, येणाऱ्या ग्राहकांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका संभवतो. ग्राहकांमध्ये देखील यासंबंधी काळजीचे वातावरण आहे. त्यामुळे सध्यातरी दुकाने सुरू झाली नसली तरी, आज ना उद्या सुरू होतील, त्यामुळे सोलापुरातील सलून दुकानदारांनी ग्राहकांसाठी नियमावली तयार केली आहे. 

ग्राहकांसाठी नियमावली 
* आजारी ग्राहकांनी केश कर्तनालयात येऊ नये. आल्यास त्यांना प्रवेश नाकारण्याचा सर्व हक्क सलून व्यवस्थापनाला असेल. 
* ग्राहकांनी चेहऱ्यावर मास्क लावावा. 
* येताना स्वतःसाठी मोठे नॅपकिन, कटिंग चादर आणावे जे मानेभोवती/अंगाभोवती गुंडाळता येईल. 
* ग्राहकाने स्वतःचे टॉवेल न आणल्यास त्याच्यासाठी निर्जंतुक केलेले, न वापरलेले टॉवेल, डिस्पोजेबल टॉवेल उपलब्ध करून देण्यात येईल, त्यासाठी 15 रुपये वेगळा शुल्क आकारण्यात येईल. 
* ग्राहकांची नोंदणी रजिस्टर बनवण्यात येईल, त्यात ग्राहकाचे नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, वय आदींची नोंद होईल. 


दुकानदारांसाठी नियमावली 
* सलूनमध्ये अधिकची स्वच्छता राखणे, कात्री, वस्तरा, फरशा व खुर्च्या वारंवार निर्जंतुक करणे. 
* मास्क, पीपीई किट, सॅनिटायझरचा वापर करणे. 
* कारागिरांच्या स्वच्छतेविषयी व आरोग्याविषयी घ्यावी. 
* आजारी कारागीर कामावर येणार नाही याची दक्षता घ्यावी. 
* एकावेळी चारपेक्षा अधिक ग्राहक दुकानात जमणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी. 


लॉकडाउन शिथिलीकरणात आज ना उद्या सलून व्यवसाय सुरू होण्याचा निर्णय होऊ शकतो. सलून कारागिरांना ग्राहकांशी थेट संपर्क करावा लागतो. त्यामुळे ग्राहकांनी व कारागिरांनीही सुरक्षेची काळजी घेणे जरुरीचे आहे. त्यासाठी ग्राहक व कारागीर व मालकांसाठी नियमावली तयार केली आहे. त्याचे पालन होण्यासाठी सर्वांनाच आवाहन करण्यात येत आहे. 
- अभयकुमार कांती, विश्‍वस्त-सचिव, संत सेना नाभिक दुकानदार संघ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT