diwali-ank.jpg 
सोलापूर

कोरोनामुळे दिवाळी अंकाची संख्या घटली : सभासदांची नोंदणीही कमीच 

अरविंद मोटे

सोलापूर : कारोनामुळे अनेक उद्योगांवर जसा परिणाम तसा प्रकाशन व्यावसायावरही झालेला असून यंदा बाजारात येणाऱ्या दिवाळी अंकाची संख्या दरवर्षीच्या तुलनेने कमी झाली असून दरवर्षी दिवाळीपूर्वी बाजारात दाखल होणारे अंक यंदा आलेच नाहीत तर काही अंक इ- स्वरुपात प्रसिद्ध झाले आहेत. वाचनालयात सभासद नोंदणी कमी झाली असली तरी अनेक साहित्यिक, रसिकांना दिवाळी अंकाची प्रतीक्षा आहे. 

महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्यावतीने प्रतिवर्षी दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी दरवर्षी दीडशे ते अडीचशे अंकाची नोंदणी होत असते. या स्पर्धेसाठी यंदा केवळ 80 अंकाची नोंदणी झाली आहे. कोकण, मराठवाडा या परिसरातून दरवर्षी 30 ते 40 अंक येत असतात. मात्र, यंदा मराठवाड्यातून एकही दिवाळी अंक स्पर्धेसाठी आलेला नसल्याचे साहित्य परिषदेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी सांगितले. 

हिराचंद नेमचंद वाचनालयात दरवर्षी 150 अंक दाखल होतात. यंदा 75 अंक आले आहेत. काही अंक दिवाळीनंतर येतात. प्रतिवर्षी दिवाळी अंकासाठी दोनशे ते तीनशे वाचक सभासद नोंदणी करतात. यंदा, मात्र 75 सभासदांची नोंदणी झाली आहे. 

पूर्व विभाग सार्वाजनिक वाचनालयात दरवर्षी 80 ते 95 अंक येतात यंदा 50 अंक आले आहेत. काही अंक दिवाळीत व नंतरही येणार आहेत. मात्र सभासद नोंदणी खूपच कमी झाली आहे. दरवर्षी 60 पेक्षा अधिक सभासद नोंदणी करतात. यंदा केवळ 15 सभासदानी नोंदणी केली आहे. कोरोनामुळे वाचकांनीही दिवाळी अंकासाठी नोंदणी कमी केली असल्याचे ग्रंथपाल रमा इप्पलपल्ली यांनी सांगितले. 

ज्योतिषविषयक दिवाळी अंकाला मागणी 
वाचकांची मागणी ज्यतिषविषयक अंकाला चांगली असून स्वयंपाकविषयक दिवाळी अंकालाही विशेष मागणी आहे. वाचकांचा ओढा या दोन्ही प्रकारच्या अंकाकडे असल्याचे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिसून आले आहे. दैनिकांचे दिवाळी अंक, भविष्यविषयक दिवाळी अंक, स्वयंपाकाची माहिती देणाऱ्या दिवाळी अंकांना बाजारात अजूनही मागणी आहे. 

यंदा न आलेले दिवाळी अंक 


पद्मगंधा, चारचौघी, चौफेर, फिरकी, उत्तम कथा, विपुल स्त्री, मनशक्ती आदीसह अनेक अंक प्रतिवर्षी दिवाळीपूर्वीच बाजारात दाखल होत असतात. मात्र, यंदा हे अंक दाखल झालेले नाहीत. यंदा वाचकांची संख्याही कमी आहे, अशी माहिती हिराचंद नेमचंद वाचनालयाचे दत्तात्रय मोरे यांनी दिली. बुकगंगा या वेबसाइटवर केवळ पाच सहा प्रकारचे निवडक दिवाळी अंक सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bankipur Election Result 2026 : भाजपाला मोठा धक्का! ३० वर्षांचा गड ढासळला; बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा दणदणीत विजय

'पूर्ण सिस्टमच त्याला वाचवतेय...'; बृजभूषण यांच्या निर्दोष सुटकेनंतर Vinesh Phogat काय म्हणाली? मोठं पाऊल उचलण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : बारवी धरण ९१ टक्के भरलं; दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Temple Development : डोंगरगाव शिवच्या तोंडेश्वर महादेव मंदिराला तीर्थक्षेत्र 'ब' वर्गाचा दर्जा; आमदार अनुराधा चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Liquor Ban: मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह 'या' दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

SCROLL FOR NEXT