SMC
SMC Canva
सोलापूर

महापालिकेकडून मुदत संपलेल्या औषधांची खरेदी ! नगरसेवक सुरेश पाटलांचा आरोप

वेणुगोपाळ गाडी

सोलापूर : कोरोना (Covid-19) आपत्ती निवारणासाठी महापालिका प्रशासनाने (Solapur Municipal Corporation) कोट्यवधी रुपयांची औषधे व साहित्य खरेदी केले, मात्र यातील काही औषधे ही मुदत संपलेली (Expired Medicine) होती, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील (Corporator Suresh Patil) यांनी आयुक्तांसमोर भर बैठकीत केला. यावर प्रशासनाने चुप्पी साधल्याने या प्रकरणी गौडबंगाल असल्याची शंका व्यक्त होत आहे. (Corporator Suresh Patil alleged that Solapur Municipal Corporation had purchased expired drugs)

कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सध्या महापालिकेत झोननिहाय बैठकांचे सत्र सुरू आहेत. बुधवारी (ता. 5) झोन क्रमांक 3 व 4 ची बैठक महापौर श्रीकांचना यन्नम यांनी स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित केली होती. या वेळी आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दूधभाते तसेच संबंधित झोनचे नगरसेवक उपस्थित होते.

या बैठकीत नगरसेवक सुरेश पाटील यांनी प्रश्नांचा भडिमार केला. सिंहगडमध्ये सध्या किती कोरोना रुग्ण आहेत, त्या तुलनेत शासन निर्देशाप्रमाणे डॉक्‍टर व अन्य मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे का, कोरोना आपत्ती निवारणासाठी प्रशासनाने औषधे व अन्य साहित्यांची खरेदी केली, त्यामधील काही औषधे ही मुदत संपलेली होती का, आरोग्य व सामान्य प्रशासन विभागाच्या भांडारांचे एकत्रीकरण नियमानुसार करता येते का, अशा विविध प्रश्नांची सरबत्ती पाटील यांनी केली.

यावर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलण्यास सांगितले; पण पाटील यांनी, तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे, असे म्हणत आयुक्तांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. विचारलेल्या प्रश्नांची माहिती प्रशासनाकडून देण्यात येत नसल्याने पाटील यांनी या बैठकीत आक्रमक पवित्रा घेतला. भाजपचे नगरसेवक नागेश बुगडे यांनी देखील रोखठोक भूमिका घेतली. या प्रकाराने आयुक्त संतापले आणि त्यांनी या नगरसेवकांना नीट बोलायला सांगा, अन्यथा आपण बैठकीतून निघून जाणार, असे महापौरांना सांगितले. यावर पांडे व अन्य जणांनी मध्यस्थी करून आयुक्तांना परावृत्त केले.

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना प्रशासन आवश्‍यक त्या उपाययोजना करीत नसल्याने परिस्थिती नियंत्रणात नाही, असे पाटील व भोगडे यांचे म्हणणे होते. शहरातील प्रत्येक प्रभागात महापालिकेने आरोग्य केंद्राची सोय करावी, ही त्यांची मागणी आयुक्तांनी मान्य केली.

दरम्यान, बैठकीनंतर सुरेश पाटील यांनी सांगितले की, कोरोना आपत्ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने खरेदी केलेल्या औषध व अन्य साहित्यांचा तपशील मी मागितला होता. या विषयीची माहिती मला देत असल्याच्या संशयावरून आयुक्तांनी उपायुक्त धनराज पांडे, आरोग्याधिकारी डॉ. बिरुदेव दूधभाते व भांडारपाल वेदपाठक यांना संबंधित जबाबदारीतून मुक्त केले, असा आरोप सुरेश पाटील यांनी केला.

काम जमत नसल्यास शासनाकडे परत जा : पाटील

या बैठकीत नगरसेवक सुरेश पाटील व आयुक्त पी. शिवशंकर यांच्यात खडाजंगी झाली. आयुक्त व्यवस्थित माहिती देत नसल्याचे पाहून संतापलेल्या पाटलांनी, व्यवस्थित काम करणे जमत नसल्यास शासनाकडे परत जा, या शब्दांत आयुक्तांना सुनावले.

महापालिकेने मुदत संपलेल्या औषधांची खरेदी केली, अशी माहिती आपल्याला मिळाली आहे. यासंदर्भात प्रशासनाने माहिती देणे जाणीवपूर्वक टाळले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी माझी मागणी आहे.

- सुरेश पाटील, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : शंभूराज देसाई यांनी बजावला मतदानाचा हक्क!

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT