Matcjing mask 
सोलापूर

शहरी व ग्रामीण भागातही रेडिमेड कपडे व साड्यांसोबत आता मॅचिंग मास्कची वाढली क्रेझ !

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्यांच्या रेडिमेड कपड्यांबरोबरच त्याच कापडापासून तयार केलेले किंवा मॅचिंगचे मास्क मिळत असल्याने ग्राहकांकडून अशा प्रकारच्या रेडिमेड कपड्यांची मागणी वाढली आहे. विशेषतः बच्चे कंपनींना ड्रेस बरोबरच या प्रकारचे मास्क आकर्षित करून घेत आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांपैकी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे हा महत्त्वाचा नियम आहे. मास्क न वापरल्यास दंड आकारण्यात येतो. काहीजण स्वतःहून मास्क वापरतात तर काही दंडाच्या भीतीपोटी वापरतात. पण मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क कोणत्या प्रकारचा वापरावा याबाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट फिरल्या. एन-95, थ्री लेअर, सर्जिकल, कापडी वॉशेबल, यूज अँड थ्रो यासह अनेक प्रकारचे मास्क बाजारात उपलब्ध झाले आहेत. गेल्या काही महिन्यांत अनेकांनी मास्क तयार करण्याचा अथवा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कोणत्या प्रकारचा मास्क कितपत सुरक्षितता देतो, हे मात्र महत्त्वाचे आहे. 

मास्क मॅचिंगचे किंवा फॅन्सी मास्क मिळण्यास सुरवात झाली आहे. वेगवेगळ्या रंगांचे, स्टीकर असलेले, डिझाईनच्या मास्कना मागणी वाढली आहे. या ग्राहकांमध्ये तरुणाईचा मोठा सामावेश होता. गेल्या काही दिवसांपासून बाजारामध्ये रेडिमेड कपड्यांबरोबरच त्याच कापडापासून बनवले गेलेले मास्क सोबत येत आहेत. लहान - मोठ्यांचे शर्ट, लहान मुलांचे कपडे, मुलींचे ड्रेस याबरोबरच आकर्षक मास्क सोबतच येत आहेत. त्यामुळे वेगळे नवीन मास्क घ्यावे लागत नाहीत. मास्क सोबत दिल्याने कपड्यांच्या किमतीमध्ये वाढ झालेली नाही. साड्यांबरोबरच मिळणाऱ्या फॅन्सी मास्कचीही क्रेझ वाढली आहे. लहान मुलांच्या ड्रेस बरोबर कार्टूनची चित्रे असलेले मास्क मिळत आहेत. या मास्कसह असलेल्या रेडिमेड कपड्यांची मागणी वाढली असल्याचे कपड्यांचे दुकानदार सांगत आहेत. 

माझ्या मुलाच्या ड्रेस बरोबरच त्याच डिझाईन व रंगाचा मास्क मिळाल्याने मुलगा खूप आनंदित झाला. आमच्या बरोबर बाहेर जाताना तो स्वतः मास्क आठवणीने घालतो.
- बाळासाहेब देवकर, 
कुर्डुवाडी 

सध्या अनेक रेडिमेड कपडे, ड्रेस, साड्या यांच्यासोबतच मॅचिंगचे मास्क येत आहेत. ग्राहक या प्रकारच्या कपड्यांची मागणी करत आहेत. 
- पवन शर्मा, 
कपड्यांचे दुकानदार, कुर्डुवाडी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT