bjym 
सोलापूर

सरसंघचालकांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या बनकरवर गुन्हा दाखल करा : भाजयुमोची मागणी

श्याम जोशी

दक्षिण सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना जाहीररीत्या जिवे मारण्याची तसेच नागपूर येथील संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याबद्दल अरुण बनकर याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजयुमोचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य समर्थ बंडे यांनी केली आहे. 

या प्रकरणी सोलापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांना निवेदन देण्यात आले असून, कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या वेळी भाजयुमोचे योगेश कबाडे, अक्षय अंजीखाने, सागर अतनुरे, प्रथमेश कोरे, वकील प्रशांत कुलकर्णी, वकील योगेश कुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

दिल्ली येथे कृषी कायद्याच्या विरोधातील भाषणात अरुण बनकर याने ही उघड उघड धमकी दिली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून भारतीय दंड संहितेच्या 118, 120 ए, 506 तसेच अन्य कलमान्वये गुन्हा आहे. सदर भाषणात अरुण बनकर याने समाजात अराजकता माजेल आणि त्यातून सामाजिक तेढ निर्माण होईल आणि लोकांना हिंसा करण्यास प्रोत्साहन दिले जाईल असे बेताल वक्तव्य केले आहे. तरी या व्यक्तीस तत्काळ संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात यावी व या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करण्यात यावी. हे प्रकरण गांभीर्याने घेऊन या प्रकरणी विनाविलंब गुन्हा नोंद करावा, असे निवेदनात म्हटले आहे. या व्हिडिओची सीडी सुद्धा उपलब्ध असल्याचे समर्थ बंडे यांनी या वेळी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT