Corona
Corona 
सोलापूर

कडक लॉकडाउन असूनही "या' गावाची वाटचाल हॉटस्पॉटकडे !

उमेश महाजन

महूद (सोलापूर) : महूद (ता. सांगोला) येथील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी कडक लॉकडाउन करूनही रुग्णसंख्या आटोक्‍यात येत नसल्याचे चित्र आहे. त्यामध्ये आज नव्याने दहा रुग्णांची भर पडल्याने या गावाची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटकडे चालू आहे. येथील एकूण रुग्णसंख्या 41 झाली आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी येथील ग्राम कृती समितीने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. 

कोरोना रुग्णांना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात येत आहेत. त्यामध्ये आज नव्याने 10 रुग्णांची वाढ झाली असून, येथील एकूण बाधित रुग्णसंख्या 41 झाली आहे. महूद गावठाणामध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. एकाच कुटुंबातील अनेकजण कोरोनाबाधित आढळत आहेत. 23 जुलैपासून येथे कडक लॉकडाउन चालू आहे. बॅंकांसह सर्व व्यवहार बंद आहेत. तरीही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोणतीही लक्षणे नसणाऱ्या कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी येथील ग्राम कृती समितीने मोठ्या प्रमाणावर रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार येथील डॉक्‍टर, मेडिकल चालक, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, कृती समितीमधील शासकीय कर्मचारी यांची रॅपिड चाचणी करण्यात आली. 

अधिक सामान्य लक्षणे, कमी सामान्य लक्षणे, गंभीर लक्षणे अशाप्रकारे लक्षणांचे वर्गीकरण करून चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील 153 जणांची रॅपिड चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये दहाजण पॉझिटिव्ह आढळून आले. तर रुग्णांच्या जवळील संपर्कातील 12 जणांचे नमुने तपासणीसाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहेत. गावठाणातील वाढता संसर्ग पाहून पुढील तीन दिवसांपर्यंत कृती समितीने जनता कर्फ्यू लागू केला आहे. या काळात फक्त अत्यवस्थ रुग्णांसाठी दवाखाने सुरू राहतील. जनता कर्फ्यू काळात मेडिकलसह सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. 

महूदचे सरपंच बाळासाहेब ढाळे म्हणाले, जनता कर्फ्यू काळात नागरिकांना औषधांची गरज भासल्यास त्यांनी आपल्या भागातील ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्राम कृती समितीशी संपर्क साधावा. कोरोनावर मात करण्याकरिता शासकीय स्तरावरून कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT