Global Teacher Ranjit Singh Disley now conducts Teacher Inspiration Workshop in all districts of the state education marathi news esakal
सोलापूर

'ग्लोबल टीचर'वर होणार शिस्तभंगाची कारवाई! शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला सीईओंकडे अहवाल

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी ग्लोबल पुरस्कारासाठी अर्ज करताना कोणत्याही अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही, जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे (डायट) नियुक्‍ती असतानाही तेथे गैरहजर राहिल्याचा ठपका त्यांच्यावर आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी ग्लोबल पुरस्कारासाठी अर्ज करताना कोणत्याही अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही, जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे (डायट) नियुक्‍ती असतानाही तेथे गैरहजर राहिल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. या पार्श्‍वभूमीवर सुरवातीला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल. त्यानंतर गैरहजर काळातील जवळपास 34 महिन्यांचे वेतन वसूल केले जाईल. पण, तत्पूर्वी तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी नियुक्‍त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालातील बाबींची पडताळणी होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

जागतिक स्तरावरील ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेकांनी डिसले गुरुजींचा सन्मान केला. पण, फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी अमेरिकेत जाण्यासाठी केलेल्या रजेच्या अर्जानंतर ग्लोबल टीचर ग्राउंडवर आले. त्यानंतर डिसले गुरुजींनी ग्लोबल पुरस्कारासाठी नेमक्‍या कोणत्या बाबींची माहिती संबंधित संस्थेला दिली होती, त्याची पडताळणी झाली. त्या वेळी त्यांनी आपली शाळा आदिवासी भागात असून ती शाळा जनावरांच्या गोठ्यात भरते. विविध भाषेतील विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत असून त्यांच्यासाठी मी कन्नड भाषा शिकलो, त्या परिसरात बालविवाहाचे प्रमाण अधिक होते, पण माझ्या प्रयत्नातून शाळेतील मुलींची संख्या वाढली आणि बालविवाह थांबले, अशा बाबी पुरस्काराच्या अर्जात नमूद केल्याची बाब समोर आली. त्यानंतर त्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी ग्लोबल टीचरवर कारवाईची मागणी झेडपीच्या सभागृहात केली. त्याअनुषंगाने प्रशासनाने आता कारवाईची फाईल हातात घेतली असून आता डिसले गुरुजींवर कारवाई अटळ मानली जात आहे.

प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला आहे. डिसले गुरुजी म्हणतात, मी 'डायट'वर काम केले आहे तर 'डायट'कडे ते फिरकलेच नाहीत, असे तेथील प्राचार्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे चौकशी समितीच्या अहवालातील प्रत्येक बाबीची पडताळणी करूनच पुढील कारवाई केली जाईल.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

माफीनाम्यानंतर प्रशासन अन्‌ ग्लोबल टीचरही गप्प
फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी काही महिन्यांची रजा द्या, अशी मागणी ग्लोबल टीचर डिसले यांनी प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती. पण, अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासंबंधी कळवूनही त्यांनी काहीच केले नाही. तरीही, रजेचा अर्ज जाणीवपूर्वक पेंडिंग ठेवला, काहींनी माझ्याकडे पैशांची मागणी केली, असा आरोप त्यांनी प्रशासनावरच केला. हा आरोप अंगलट येईल, याची जाणीव झाल्यानंतर ग्लोबल टीचर यांनी दोन पाऊल मागे घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माफीनामा दिला. पण, माफीनामा दिला तरीही त्यांना आरोपांचा खुलासा करावाच लागेल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली. त्यानंतर डिसले गुरुजीही गप्प आणि प्रशासनही शांत झाल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT