'ती' गुलालात माखली, मग 'ही' का घाबरली? esakal
सोलापूर

सांगली, सातारा डीसीसी गुलालात माखली, मग सोलापूर का घाबरली?

सांगली, सातारा डीसीसी गुलालात माखली, मग सोलापूर डीसीसी का घाबरली?

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सांगली, सातारा डीसीसी निवडणुकीचा निकाल राज्यभर चर्चेत आला आहे.

सोलापूर : राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) जिंकले. राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम (Vishwajit Kadam) यांचे काका आमदार मोहन कदमही (Mohan Kadam) जिंकले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) पडले. राष्ट्रवादीचे (NCP) आमदार शशिकांत शिंदेही (Shashikant Shinde) पडले. सांगली (Sangli0, सातारा (Satara) डीसीसी निवडणुकीचा निकाल राज्यभर चर्चेत आला आहे. सांगली आणि सातारा डीसीसी निवडणुकीच्या गुलालात माखली असताना मग सोलापूर डीसीसी (Solapur DCC Bank) निवडणुकीला का घाबरली? असा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या राजकारणात आमदार शशिकांत शिंदे यांचा करेक्‍ट कार्यक्रम कोणी केला?, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी डाव साधला? की भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने आमदार शिंदे यांचा करेक्‍ट कार्यक्रम केला? याचे राजकीय कोडे सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला पडले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली व सातारा जिल्हा बॅंकेसोबतच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेलाही गुलालात माखण्याची संधी आली होती. गुलालात माखण्याऐवजी सोलापूर डीसीसी निवडणुकीला का घाबरली? हा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.

सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलून कोणी कोणाचे हित साधले? हा प्रश्न आजही सोलापूरच्या राजकारणात अनुत्तरीतच आहे. सांगली जिल्हा बॅंकेला 94 वर्ष पूर्ण झाली. संचालकांच्या खाबुगिरीत एकेकाळी अडकलेल्या सांगली बॅंकेवर तब्बल पावणे तीन वर्षे प्रशासक होते. खाबुगिरीतील सांगली बॅंकेला पुन्हा संचालकांच्या हाती करणारे सांगली डीसीसीचे डॉक्‍टर तथा प्रशासक शैलेश कोथमिरे सध्या सोलापूर डीसीसीचे प्रशासक आहेत. संचालक गेले आणि प्रशासक आले, सोलापूर बॅंक मात्र आजही जुनेच घाव सोसत आहे. जिल्हा बॅंक निवडणुकीच्या गुलालात माखणार की प्रशासकाच्या माध्यमातूनच बॅंकेचा कारभार हाकला जाणार? याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कोण होतीस तू...

1975 मध्ये आलेल्या 'झुंज' या मराठी चित्रपटात गीतकार जगदीश खेबुडकर यांनी गायलेले 'कोण होतीस तू, काय झालीस तू... अग वेडे कशी वाया गेलीस तू'... हे गाणं आज सोलापूर जिल्हा बॅंकेच्या आर्थिक आणि राजकीय स्थितीला तंतोतंत लागू पडत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात असलेल्या पुणे जिल्हा बॅंकेची स्थापना 1917 मध्ये झाली. त्यानंतर अवघ्या एका वर्षात म्हणजे 1918 ला सोलापूर जिल्हा बॅंकेची स्थापना झाली. सांगली जिल्हा बॅंक 1927 ला तर कोल्हापूर जिल्हा बॅंक 1938 ला सुरू झाली. सातारा जिल्हा बॅंक 1950 ला सुरु झाली. पुणे जिल्हा बॅंक जेव्हा स्थापन झाली त्यानंतर अवघ्या एका वर्षात 1918 ला सोलापूर जिल्हा बॅंक स्थापन झाली. 103 वर्षांचा इतिहास असलेल्या आणि पूर्वजांनी जपलेल्या सोलापूर डीसीसीची कशी व का वाट लागली?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT