Sugarcane Cutter 
सोलापूर

ऍडव्हान्स फेडण्यासाठी ऊसतोड मजुरांची दिवाळी उसाच्या फडातच ! 

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : या वर्षीचा ऊस हंगाम कोरोना महामारीच्या संकटात सुरू झाला आहे. असे असताना पोटाची खळगी भरण्यासाठी सहा महिने आपले मूळ गाव सोडून आपल्या बच्चेकंपनीसह चंबूगबाळं घेऊन शेकडो मैल अंतरावरावरून येणाऱ्या ऊसतोड मजुरांना आपला ऍडव्हान्स फेडण्यासाठी पहाटेपासून सायंकाळपर्यंत उसाच्या फडात राबावे लागत आहे. त्यामुळे या ऊसतोड मजुरांची दिवाळीही उसाच्या फडातच साजरी होत आहे. 

गावातील घराकडे एखादी व्यक्ती ठेवून ऊसतोड ऊस तोडणीसाठी परिसरात दाखल झाले आहेत. या वर्षी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने ऊसतोड हंगाम लांबला आणि या वर्षीसाठी घेतलेली रक्कम भेटेल की नाही ही शंकाच आहे. रोज पहाटे न चुकता सायंकाळी अंधार पडल्यावर आपल्या झोपडीत तात्पुरता विसावा घ्यायचा, असा हातावर पोट असणाऱ्या ऊसतोड कामगारांचा नित्यक्रम झाला आहे. सोबत लहान लहान बच्चे कंपनी असल्याने त्यांच्या शिक्षणाचा मात्र खेळखंडोबा ठरलेलाच. 

करमाळा तालुक्‍याच्या ऊस पट्ट्यामध्ये बीड, धुळे, नंदुरबार, साखरी, केज, शहादा, सटाणा, नंदुरबार, नगर, अंबेजोगाई, मालेगाव आदी जिल्ह्यांबरोबरच परराज्यांतूनही ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत. मात्र या सर्वांना फराळाविनाच रोजच्याच चटणी- भाकरीबरोबर उसाच्या फडातच दिवाळी साजरी करावी लागली. काही ठिकाणी काही ऊसतोड मजुरांना सामाजिक संस्था तसेच कारखान्यांकडून दिवाळीचा फराळ मात्र देण्यात आला. 

"सर्वत्र दिवाळी साजरी करण्यात येत असताना आम्हाला कसली आलीय दिवाळी, असा सवाल सटाणा (जिल्हा औरंगाबाद) येथील ऊसतोड मजूर बन्शीराम माने यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Accident: भीषण बस अपघात! जिवंत जळाले प्रवासी… एका क्षणात आनंदाचा प्रवास झाला मृत्यूचा थरार! Video पाहा

Latest Marathi News Live Update : नागपूर विद्यापीठात प्र-कुलगुरू नियुक्ती पुन्हा लांबणीवर, बैठक अचानक स्थगित

Aryaman Birla: आयपीएल खेळाडू ते संघाची मालकी; रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचे संचालक आर्यमन बिर्ला यांचा प्रवास

Tamannaah Bhatia And Sidharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्रा तमन्ना भाटिया पुन्हा एकत्र, ‘व्वन’ चित्रपट २८ ऑगस्टला भेटीला!

Surgery Controversy: उलटी, तापातही शस्त्रक्रिया; प्राध्यापकाचा मृत्यू, साेलापूरात कॅशलेससाठी ऑपरेशनचा आरोप; महापालिका आरोग्य विभाग गप्प!

SCROLL FOR NEXT