Diwali Solapur.jpg
Diwali Solapur.jpg 
सोलापूर

सोलापूरच्या खाद्यसंस्कृतीवर साकारणार दिवाळी अंक :'सकाळ'कडून सुगरण महिलांसाठी पर्वणी; रेसिपी पाठवण्याचे आवाहन 

सकाळवृत्तसेवा


सोलापूर ः सोलापूरचे पर्यटन वाढावे तसेच येथील खाद्य पदार्थांना मागणी वाढावी, त्यातून येथील रोजगार व उद्योगाची भरभराट व्हावी, यासाठी "सकाळ'ने आगामी वर्षात पर्यटनावर विशेष भर देण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील अध्यात्मिक स्थानांचे महत्त्व विषद करतानाच सातासमुद्रापार ख्याती मिळविलेल्या व प्रकृतीस पाचक अशा खाद्य संस्कृतीचा दबदबा आणखी वाढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या दिवाळी अंकात सोलापूरच्या खाद्य संस्कृतीवर विशेष भर देण्यात येत आहे. "सकाळ' महिलांसाठी "सोलापूरच्या पारंपरिक खाद्य संस्कृती'वर दिवाळी अंक काढत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील महिलांना आपल्या रेसिपी पाठवण्याचे आवाहन "सकाळ'च्यावतीने करण्यात आले आहे. 

महिलांच्या विविध कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने सोलापूर"सकाळ'च्या वतीने नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणून यंदाचा दिवाळी अंक महिलांनी दिलेल्या रेसिपीने भरलेला असेल. रेसिपी पाठविण्यासाठी वयाची कोणतीही अट राहणार नाही. रेसिपीच्या व्हिडीओचा क्‍यूआर कोडही देण्यात येईल. या उपक्रमात भाग घेण्यासाठी आपल्या रेसिपीची सुवाच्च अक्षरातील लिखित कॉपी किंवा युनिकोड स्वरुपातील टेक्‍स्ट मजकूर, संबंधित स्पर्धकाचा फोटो, तयार पदार्थाचा फोटो या क्रमांकावर पाठवावा. संबधित रेसिपीचा एक व्हिडीओ abhaykumar.supate@esakal.com या आयडीवर मेल करायचा आहे. त्यामध्ये रेसिपीबाबतची माहिती व त्याचे विवरण ऑडिओ स्वरुपात असणे बंधनकारक राहील. व्हिडीओ किमान तीन मिनिटांचा असावा. निवडक व्हिडीओना डिजिटलवर प्रसिध्दी देण्यात येईल. 

सहभाग नोंदवताय... 

  • फक्त सोलापूर शहर व जिल्ह्यातील महिलांसाठी हा उपक्रम 
  • शाकाहारी किंवा मांसाहारी रेसिपी चालतील
  • एका महिलेस एकाच विभागात संधी सोलापूरच्या खाद्य संस्कृतीबरोबर अन्य 
  • पदार्थांच्या रेसिपींनाही स्थान प्रथम येणाऱ्या रेसिपींचाच प्राधान्याने विचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT