warkari 
सोलापूर

मोठी ब्रेकिंग ! कार्तिकी वारी यंदा नकोच; जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

तात्या लांडगे

सोलापूर : पांडूरंगाची कार्तिकी वारी 26 नोव्हेंबरला होणार असून त्यावेळी पंढरीत वारकऱ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्यात सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे पालन होणार नाही. वारकऱ्यांच्या संख्येत आरोग्य यंत्रणा अपुरी पडेल. त्यामुळे यंदाची कार्तिकी वारी प्रतिकात्मक स्वरुपात साजरी व्हावी, मानाच्या दिड्यांनी पंढरीकडे मार्गस्थ होऊ नये. पांडूरंगाचे धार्मिक विधी पंरपरेनुसार पार पडतील, मात्र वारकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून संबंधित यंत्रणांना त्यानुसार आदेश द्यावेत, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाठविला प्रस्ताव
कार्तिक वारीनिमित्ताने पंढरपुरात भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षितता म्हणून भाविकांना यंदाची वारी प्रतिकात्मक स्वरुपात साजरी व्हावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून सरकार दरबारी पाठविला आहे.
- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण


मंदिरे सुरु झाल्यानंतर पंढरीत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने आता दररोज दोन हजार भाविकांना मुखदर्शनासाठी सोडले जात आहे. मात्र, आठ महिन्यांपासून श्री विठ्ठल- रूक्‍मिणी मंदिर बंद असल्याने यंदा कार्तिकी वारीसाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी होईल. त्या गर्दीत वयस्क भाविकांना श्‍वास घेण्यास अडचणी येतील, दर्शन रांगेत तथा वाळवंटात, मठात वारकऱ्यांची गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊ शकणार नाही. दोन व्यक्‍तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवल्यास सध्याची पाच किलोमीटरची रांग 25 किलोमीटरपर्यंत जाईल. गर्दीमुळे आरोग्य यंत्रणाही अपुरी पडेल. त्यामुळे वाळवंट परिसरात, 65 एकर परिसरात वारकऱ्यांना राहता येणार नाही. तत्पूर्वी, मंदिर समितीच्या ठरावावर प्रातांधिकाऱ्यांनी अभिप्राय देत तो प्रस्ताव जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना पाठविण्यात आला. त्यानुसार तो प्रस्ताव आता विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गेला आहे. दरम्यान, कोरोनामुळे वारकऱ्यांनी वारीदिवशी पंढरपुरात गर्दी न करता इतरवेळी टप्प्याटप्याने दर्शनासाठी यावे. आता स्वत:च्या घरी तथा गावातच वारी साजरी करावी, असे आवाहन प्रातांधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.


उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवर आचारसंहितेचे सावट
कार्तिक वारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांच्या आगमनाच्या दृष्टीने प्रशासन व मंदिर समितीतर्फे सर्व उपाययोजना केल्या आहेत. मात्र, पदवीधर व शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरु आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यासाठी मान्यता घ्यावी, असाही प्रस्ताव विधी व न्याय विभागाला जिल्हा प्रशासनाकडून पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतरच उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT