kattalkhana.jpg
kattalkhana.jpg 
सोलापूर

मुळेगाव (तांडा) कत्तलखान्यास मुदतवाढ नकोच : भाविक वारकरी मंडळाची मागणी 

शाम जोशी

दक्षिण सोलापूर (सोलापूर)ः मुळेगाव तांडा येथील कत्तलखान्याची मुदत आक्‍टोंबरपर्यंत संपल्यान आता पुन्हा मुदतवाढ देऊ नये अशी मागणी भाविक वारकरी मंडळाने केली आहे. 

मुळेगावं तांडा (ता. दक्षिण सोलापूर) हैद्राबाद रोड येथील कत्तल खाना अनेक दिवसापासून सुरु आहे. या कत्तलखाना चालविण्याची अधिकृत परवानगी ऑक्‍टोंबरपर्यंत होती. ती परवानगी वाढवू नये. कत्तलखाना बंद करण्यात यावा, अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे. 

या कत्तलखान्यात होणाऱ्या अनेक निष्पाप जिवाचा बळी घेतला जात आहे. गोवंश, गोहत्या थांबली पाहिजे. पशु हत्या थांबली पाहिजे. देश व संस्कृती टिकावी, भविष्य उज्वल बनविन्यासाठी कत्तलखाना बंद झाला पाहिजे. केंद्र सरकार कडून गोहत्या, गोवंश हत्या बंदी कायदा करण्यात आला आहे. पण त्या कत्तलखाण्याला पूर्वी परवानगी देण्यात आली होती. परंतु त्या परवानगी मुदत संपली आहे. मुदत वाढ न देता कत्तलखाना बंद करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष), अभिमन्यू डोंगरे महाराज, जोतिराम चांगभले, मोहन शेळके, संजय पवार, कुमार गायकवाड उपस्थित होते.  

संपादन ः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT