'डॉक्‍टरांच्या मनोबलाचे खच्चीकरण करू नका! राज्यात 100 डॉक्‍टर कोरोनामुळे शहीद' Gallery
सोलापूर

'डॉक्‍टरांच्या मनोबलाचे खच्चीकरण करू नका! 100 डॉक्‍टर कोरोनामुळे शहीद'

'डॉक्‍टरांच्या मनोबलाचे खच्चीकरण करू नका! राज्यात 100 डॉक्‍टर कोरोनामुळे शहीद'

प्रशांत काळे

समाजात कार्य करणाऱ्या डॉक्‍टरांच्या मनोबलाचे खच्चीकरण करू नका. कोरोना काळात त्यांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी केले.

बार्शी (सोलापूर) : देशासह राज्यात कोविडचा (Covid-19) मोठा प्रादुर्भाव झाला. दोन लाटेमध्ये सामान्य नागरिकांसह राज्यातील शंभर डॉक्‍टरांचे (Doctor) मृत्यू झाले. रुग्णांवर उपचार करताना जीव धोक्‍यात घालून डॉक्‍टर शहीद झाले आहेत. समाजात कार्य करणाऱ्या डॉक्‍टरांच्या मनोबलाचे खच्चीकरण करू नका. कोरोना काळात त्यांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय वैद्यक संघटनेचे (National Medical Association) (आयएमए) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे (Dr. Ramkrishna Londhe) यांनी केले.

डॉ. संजय अंधारे यांच्या रुग्णालयासंदर्भात झालेल्या आरोपांबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. या वेळी डॉ. बी. वाय. यादव, गर्भलिंग निदान प्रतिबंधक समितीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. प्रशांत मोहिरे, डॉ. संजय अंधारे, डॉ. सोमाणी, डॉ काबरा, डॉ. जगताप, डॉ. सातपुते उपस्थित होते.

डॉ. लोंढे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण जास्त होते. कोणत्याही डॉक्‍टरला रुग्णाचा मृत्यू व्हावा, असे वाटत नाही. कोरोनाचे उपचार शासनाच्या निर्देशानुसार करण्यात येत होते. पण अशा परिस्थितीत डॉक्‍टरांवर आरोप होऊन त्यांचे खच्चीकरण होत होते. डॉ. अंधारे यांच्या हॉस्पिटलमध्ये आशा सुतार या महिलेचा मृत्यू झाला होता. याबाबत तक्रारी झाल्या. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्यासह प्रकरण मंत्रालयापर्यंत गेले. याप्रकरणी समिती नेमून त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, उपचार मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. एखाद्या डॉक्‍टरवर सोशल मीडियावर टीका टिप्पणी करताना संबधित डॉक्‍टरांचेही म्हणणे घ्यावे, त्यांना मानसिक त्रास होईल असे मजकूर प्रसिद्ध करू नयेत. राज्यात कोरोना कालावधीत योगदान दिलेल्या पाच डॉक्‍टरांची पंतप्रधान व जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली असून पुणे विभागातून मुंबईचे दोन, पुणे, नांदेड, नागपूरसह बार्शीच्या डॉ. संजय अंधारे यांची निवड झाली आहे, ही बार्शीसाठी अभिमानाची घटना असल्याचे डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी सांगितले.

डॉ. संतोष कुलकर्णी म्हणाले, कोरोनावर उपचार करताना डॉक्‍टर मृत झाले. पण 50 लाख विमा रक्कम अद्याप मिळालेली नाही. संघटनाच आता त्यांच्या कुटुंबांना मदत करणार आहे. रुग्णांवर उपचार करताना अनेक डॉक्‍टरांना झळ पोचली आहे. याचा शासन विचार करीत नाही. आम्ही कोणाला पाठीशी घालणार नाही; पण अन्याय झाला असेल तर कायदेशीर मार्गाने कारवाई करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Case: सुप्रीम कोर्टानेही मानलं शिवसेना ठाकरेंची? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादातून नेमकं काय समोर आलं? ते 11 मुद्दे काय?

Real Estate Revenue: बांधकाम क्षेत्राला अच्छे दिन! चार महिन्यांत मुद्रांक विभागाचा महसूल २१,९२८ कोटींवर; १७ टक्क्यांनी वाढ

Koyna Dam Water Level : कोयना धरणातील पाणीसाठा चार दिवसांपासून 92 टीएमसीवर स्थिर; महाबळेश्वर, नवजा, कोयनानगरमध्ये किती पाऊस?

Marathi News Live Updates : पुण्यासह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, कोल्हापूर, कोकणासाठी आज यलो अलर्ट जारी

Tukaram Mundhe: अ‍ॅनालॉग पनीर बंदीवर तुकाराम मुंढेंचे स्पष्टीकरण, सावजीबाबत माफीचा प्रश्नच नाही

SCROLL FOR NEXT