animal market 
सोलापूर

सांगोल्यातील जनावरांचा बाजार बंद झाल्याने आर्थिक उलाढाल झाली ठप्प ! 

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : मार्चपासून कोरोनाच्या साथीमुळे संपूर्ण जग लॉकडाउन झाले होते. हळूहळू कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्यात सांगोला येथील जनावरांचा आठवडा बाजार बंदच आहे. फक्त जनावरांचा आठवडा बाजार बंद असल्याने छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांवर आणि शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक संकट ओढावले आहे. म्हणून सांगोला येथील जनावरांचा बाजार तत्काळ सुरू करण्यात यावा, अशी मागणी व्यापारी बांधवांनी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्याकडे केली आहे. 

सोलापूर जिल्हा व परिसरातील व्यापारी बांधवांनी आपल्या मागणीचे निवेदन दीपक साळुंखे-पाटील यांना दिले. या वेळी रामचंद्र वाघमोडे, बाबूराव सोपे, शिवाजी हजारे, योगेश थोरबोले, सत्यवान गडदे, बापू गावडे, तुषार वाघमोडे सचिन वाघमोडे, दीपक कांबळे, भिवाजी गावडे, जयवंतराव जगताप, रामचंद्र फडतरे, सतीश सावंत, रावसाहेब शिंदे, प्रकाश सावंत, दिनकर लांडगे, शिवाजी चौगुले, भगवान साळुंखे, सलीम मुंडे, प्रकाश साळुंके, हनुमंत साळुंखे, आबासो गेजगे, विष्णुपंत गेजगे, रमेश गेजगे आदींसह व्यापारी व शेतकरी उपस्थित होते. 

सांगोला येथील जनावरांचा आठवडा बाजार पश्‍चिम महाराष्ट्रात खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध समजला जातो. या बाजारात मिरज, कराड, पेठ वडगाव, मुरगुड, मोडनिंब, वैराग, बार्शी, जत, कवठे महांकाळ, आटपाडी, पंढरपूर आदींसह परिसरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी व व्यापारी दर आठवड्याला दाखल होत असतात. प्रत्येक बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. गेल्या नऊ महिन्यांपासून हा आठवडा बाजार बंद असल्याने प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे छोटे-मोठे व्यापारी व शेतकऱ्यांची उपासमार होऊ लागली आहे. म्हणून शेतकरी व व्यापाऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर सांगोला येथील जनावरांचा आठवडा बाजार सुरू करावा, अशी विनंती व्यापारी बांधवांनी केली आहे. 

कोरोनाबरोबर लंपीचेही संकट 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन केल्याने जनावरांचा आठवडा बाजारही बंद करण्यात आला होता. कोरोनाची महामारी कमी झाल्यावर आठवडा बाजार सुरू केला. परंतु, लंपीच्या संकटाने जनावरांचा बाजार बंद करण्यात आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

Parbhani Drought-Like Situation : पाणी, चारा, पीक पस्थितीचा आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनास सतर्कतेचे निर्देश

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT