भीषण अपघातामुळे सोमनाथचे पोलिस भरतीचे स्वप्न भंगले!
भीषण अपघातामुळे सोमनाथचे पोलिस भरतीचे स्वप्न भंगले! esakal
सोलापूर

भीषण अपघातामुळे सोमनाथचे पोलिस भरतीचे स्वप्न भंगले!

चंद्रकांत देवकते

भीमानगर येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये मृत पाच जणांपैकी मोहोळ येथील गवत्या मारुती चौकातील सोमनाथ लक्ष्मण माळी या तरुणाचा समावेश आहे.

मोहोळ (सोलापूर) : भीमानगर (Bhimanagar) येथे झालेल्या शनिवारी (ता. 27) ट्रक व टॅंकरच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये (Accident) मृत पाच जणांपैकी मोहोळ (Mohol) येथील गवत्या मारुती चौकातील सोमनाथ लक्ष्मण माळी (Somnath Mali) या तरुणाचा समावेश आहे. तो पुणे येथे एअरफोर्सच्या (Air Force) लेखी परीक्षेसाठी निघाला होता. मात्र काळाने त्याच्यावर झडप घातल्याने या अपघातामध्ये लक्ष्मणचा दुर्दैवी मृत्यू झाला व अखेर त्याचे पोलिस होण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोहोळ येथील सोमनाथ माळी हा पंचवीस वर्षीय युवक गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पोलिस भरती तसेच एअरफोर्स भरतीसाठी सातत्याने प्रयत्न करत होता. जन्मदात्या आईचे सात वर्षांपूर्वीच छत्र हरपले होते. तरीही वडिलांनी हमाली करत प्रपंच सांभाळला व मुलाच्या पोलिस होण्याच्या इच्छेला प्रोत्साहन देत राहिले. घरातील परिस्थितीची जाणीव ठेवत सोमनाथही जिद्दीने दैनंदिन अभ्यास व व्यायाम करीत पोलिस भरती परीक्षेची तयारी करत होता. मागील दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा झाल्या नाहीत, मात्र त्याने खचून न जाता दुकानामध्ये काम करत स्वतः पैसे जमवले व त्यातूनच पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घेतला. त्या माध्यमातून तो तयारी करत होता.

दरम्यान, सोमनाथचा 28 नोव्हेंबर रोजी पुणे येथे एअरफोर्सचा लेखी परीक्षेचा पेपर सकाळी आठ वाजता होता. परंतु पुण्याला जाण्यासाठी एसटीचा संप असल्याकारणाने एसटी नव्हती. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने पुण्याला परीक्षेला जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी 27 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान मोहोळहून पुण्याकडे निघालेल्या मालट्रक (क्रमांक एमएच 25 यू 4045) मधून पुण्याकडे निघाला होता. त्याच्यासोबत इतर आठ ते दहा प्रवासी मालट्रकमध्ये बसले होते. दरम्यान, साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सदरचा ट्रक हा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भीमानगर (ता.माढा) गावच्या हद्दीतील एका ढाब्यासमोर आला असता पुण्याकडून सोलापूरकडे निघालेल्या मळी वाहतुकीच्या टॅंकरची (क्रमांक एमएच 25 सीपी 4020) ची समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भयानक होता की, या अपघातामधील पाचजणांचा मृत्यू तर सहाजण गंभीर जखमी झाले. या मृतांमध्ये मोहोळ येथील सोमनाथ माळी याचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत सोमनाथच्या शरीरापासून मुंडके वेगळे झाल्यामुळे पहाटेपर्यंत पोलिस व सामाजिक कार्यकर्ते त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर त्याच्या खिशातील मोबाईलच्या अखेरच्या कॉलवरून त्याच्या मित्राला संपर्क करून ओळख पटवून नातेवाइकांना संपर्क करण्यात आला. त्यानंतर त्याचे नातेवाईक टेंभुर्णी येथे गेले व मृतदेह ताब्यात घेऊन रविवारी (ता. 28) दुपारी मोहोळ येथे त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत सोमनाथच्या पश्‍चात वडील, एक भाऊ व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT