Edible Oil. 
सोलापूर

ऐन सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेल खाऊ लागले भाव ! 

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : सध्या फारशी मागणी नसली तरी मंदावलेली आयात व परतीच्या पावसामुळे तेलबियांच्या पिकांचे झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर आगामी दसरा, दिवाळी सणाच्या तोंडावर खाद्यतेलाचे दर 125 ते 300 रुपयांनी वाढले आहेत. कोरोना महामारीमुळे सुरू झालेल्या लॉकडाउनपूर्वीचे खाद्य तेलाचे दर व आताचे दर पाहिल्यास या दरांमध्ये 125 ते 300 रुपयांचा फरक पडल्याचे दिसून येत आहे. 

मध्यंतरी झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांना मोठा फटका बसला. यामध्ये सोयाबीन, सूर्यफूल पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच परदेशातून होणारी आयातही मंदावली आहे. सोयाबीन, पामोलिन, सरकी तेलाच्या दरात (15 किलो डबा) मोठी वाढ झाली आहे. 

आगामी सणासुदीच्या काळात खाद्य तेलाची मागणी वाढणार आहे, तसेच त्यांचे दरही आणखी वाढतील, असे केत्तूर (ता. करमाळा) येथील किराणा व्यापारी दिलीप खेडकर व सुहास निसळ यांनी "सकाळ"शी बोलताना सांगितले. 

याबाबत केत्तूरचे नागरिक लक्ष्मण खैरे म्हणाले, कोरोना महामारीचा सामना करताना सर्वसामान्य नागरिक अगोदरच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच रोज लागणाऱ्या अत्यावश्‍यक वस्तूंच्या दरात वरचेवर वाढ होत आहे. त्यामुळे संकटात अधिकच भर पडत आहे. 

ग्राहक विजय रोंगे म्हणाल, गेल्या पाच - सहा महिन्यांपासून सर्व व्यवसाय बंद असल्याने आर्थिक तंगी आहे. त्यातच जवळजवळ सर्वच वस्तूंचे दर वरचेवर वाढत आहेत. खाद्यतेलांच्या किमतीत भरमसाठ वाढ होत असल्यामुळे आता चमचमीत खाण्यावरही बंधने घालावी लागत आहेत. 

खाद्यतेलांचे दर : (15 किलो) (लॉकडाउनपूर्वीचे दर - सध्याचे दर) 

  • पामतेल : 1375 - 1500 
  • जेमिनी (सूर्यफूल) : 1480 - 1800 
  • मुरली (कॉटन सीड ऑईल) : 1350 - 1500 
  • सोयाबीन : 1200 - 1500 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले शेगावचे गजानन महाराज संस्थान, १ कोटी ११ लाख रुपये दिले मुख्यमंत्री सहायता निधीत

Asian Games 2026 : नवी मुंबईच्या Harita Bhadra ने ०.०१ सेकंदाच्या फरकाने जिंकले पदक; आहे भारताची दुसरी सर्वात वेगवान धावपटू

Election Commission controversy: मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाण यांची ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी

चीन अमेरिकन कंपन्यांचे AI तंत्रज्ञान चोरत आहे का? पाहा 'डिस्टिलेशन' म्हणजे काय? ज्यावरून USA अन् China मध्ये रंगलाय वाद...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT