

Ashwini Bhide
ESakal
महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात, अश्विनी भिडे हे नाव कार्यक्षमता, शिस्त आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची वेळेवर पूर्तता या गुणांचेच जणू समानार्थी बनले आहे. नुकतीच त्यांच्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जे मुंबईतील सर्वात महत्त्वाचे प्रशासकीय पद मानले जाते. अश्विनी भिडे या भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) १९९५ च्या तुकडीतील अधिकारी आहेत.