North Solapur 
सोलापूर

नान्नज, हगलूर, भागाईवाडीमध्ये महिलाराज ! बाजार समितीचे संचालक चोरेकरांचा उपसरपंच पदासाठी झाला पराभव 

संतोष सिरसट

उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्‍यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नान्नजमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप युतीने सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राणी टोणपे सरपंच तर भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संभाजी दडे यांच्या पत्नी ज्योती दडे या उपसरपंच झाल्या आहेत. त्यांनी उपसरपंच पदाच्या निवडणुकीत बाजार समितीचे संचालक प्रकाश चोरेकर यांचा दहा विरुद्ध सात मतांनी पराभव केला. 

नान्नज ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपची युती झाली होती. त्या विरोधात शिवसेना मैदानात उतरली होती. 17 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपचे दहा तर शिवसेनेचे सात सदस्य निवडून आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपच्या युतीमध्ये दहापैकी दोन सदस्य हे भाजपचे तर आठ सदस्य हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. नान्नज ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सर्वसाधारण महिला विजयी झाली नव्हती. त्यामुळे त्यांनी अनुसूचित जातीच्या राणी टोणपे या महिलेला सरपंच पदाची संधी दिली आहे तर भाजपच्या ज्योती दडे यांना उपसरपंच पदी विराजमान केले आहे. 

उपसरपंच पदासाठी बाजार समितीचे संचालक प्रकाश चोरेकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र या निवडणुकीत भाजपच्या दडे यांनी त्यांचा दहा विरुद्ध सात अशा मतांनी पराभव केला. बाजार समितीच्या निवडणुकीत पंचायत समितीचे माजी सदस्य इंद्रजित पवार यांचा प्रकाश चोरेकर यांनी पराभव केला होता. मात्र उपसरपंच पदाच्या निवडणुकीत पवार यांचेच कार्यकर्ते असलेल्या दडे यांनी चोरेकर यांचा पराभव केला आहे. त्यामुळे नेत्यांच्या पराभवाचा वचपा कार्यकर्त्यांनी काढल्याची चर्चा नान्नज मध्ये सुरू आहे. 

हगलूरमध्येही महिलाराज आले असून सरपंच पदी आरिफा पठाण तर उपसरपंच पदी शांताबाई चव्हाण यांची निवड झाली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या युतीने सत्ता वाटून घेतली असल्याचे दिसून येते. सभापती रजनी भडकुंबे यांच्या गावामध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेची युती सरपंच व उपसरपंच पदासाठी झाली आहे. याशिवाय भागाईवाडी ग्रामपंचायतीमध्येही महिलाराज आले असून सरपंच व उपसरपंच या दोन्ही महिला आहेत. त्यामुळे नान्नज, हगलूर आणि भागाईवाडी या तीन गावच्या चाव्या महिलांच्या हाती आल्याचे या निवडीवरून दिसून येते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-New Zealand FTA: 20 ऑक्टोबरपासून दारू होणार स्वस्त! भारत-न्यूझीलंड FTA मुळे तुम्हाला काय फायदा?

Tempo Bike Accident : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दोन मोटारसायकलला पाठीमागुन उडविल्याने एक जणाचा मृत्यू; तर एकजण जखमी

Marathi News Live Updates: अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिलांचा सहभाग

Pitru Paksha 2026: यंदा पितृ पंधरवडा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तिथी

Marathwada Drought : पावसाने पाठ फिरवली; शेतकरी हवालदिल;सोयाबीनला पाणी देण्याची धडपडही निष्फळ; आर्थिक संकट गडद

SCROLL FOR NEXT