ahilyadevi-holkar SOLAPUR UNIVERCITY 
सोलापूर

धक्‍कादायक ! परीक्षा नियंत्रकासाठी 15 पैकी अकराजण अपात्र 

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदासाठी राज्यभरातून 15 जणांनी अर्ज केले. मात्र, विद्यापीठाच्या छाननी समितीने त्यापैकी तब्बल 11 अर्ज अपात्र ठरवले असून संबंधितांना पुरेसा अनुभव नसल्याचे कारण पुढे केले. अपात्र ठरविलेल्या उमेदवारांना हरकती नोंदविण्यासाठी 20 फेब्रुवारी अंतिम मुदत देण्यात आली आहे. 


विद्यापीठाचे तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत कोकरे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या रिक्‍त पदासाठी अर्ज मागविण्यात आले. नाशिक, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यांतून विद्यापीठाला 15 अर्ज प्राप्त झाले. 2 फेब्रुवारीला प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. छाननी समितीने त्यातील 11 जणांना या पदावर काम करण्यासाठी पुरेसा अनुभव नसल्याचे निरीक्षण नोंदवले. दरम्यान, अपात्र उमेदवारांना हरकती नोंदविण्यासाठी 20 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. हरकती प्राप्त न झाल्यास उर्वरित चार उमेदवारांना मुलाखतीसाठी निमंत्रित केले जाणार आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समितीद्वारे परीक्षा नियंत्रकांची निवड केली जाणार आहे. मार्चपर्यंत नवा परीक्षा नियंत्रक निवडला जाणार असल्याने त्या पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे. 

पात्र अन्‌ अपात्र ठरलेले उमेदवार 
डॉ. अंबादास भांडू, डॉ. दुष्यंत कटारे, डॉ. गजानन पाटील, डॉ. शिवकुमार गणापूर या चार जणांचे परीक्षा नियंत्रक पदासाठीचे अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत. तर, डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. काशिनाथ मुंडे, डॉ. मलिक रोकडे, डॉ. रवींद्र मुळे, डॉ. प्रदीपकुमार दराडे, डॉ. सुहास असगेकर, डॉ. अर्जुन घाटुळे, डॉ. मधुरा जगताप, डॉ. मल्हारी मसलखांब, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, डॉ. विलास शिंदे या 11 जणांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. 


छाननीत समितीने केले 11 अर्ज बाद 
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदासाठी 15 जणांनी अर्ज केले होते. परंतु, त्यापैकी अकराजणांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले असून त्यांना कामाचा पुरेसा अनुभव नसल्याने ते बाद ठरविले आहेत. संबंधितांना हरकत घेण्यासाठी 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 
- डॉ. विकास घुटे, कुलसचिव, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Merger News : बापाच्या टीकेवर लेकीचं उत्तर! सुनिल तटकरेंवर होत असलेल्या टीकेवर अदिती तटकरेंचे स्पष्टीकरण; राष्ट्रवादी विलीनीकरण होणार का?

Sonia Gandhi: सोनिया गांधी यांचे बहुचर्चित बेस्ट सेलर पुस्तक

Australia Cricket : ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये 'युद्ध'! डेव्हिड वॉर्नर सँडपेपर प्रकरणावरून पॅट कमिन्सच्या विरोधात उभा राहिला, उस्मान ख्वाजाची पाठराखण...

Latest Marathi News Live Update : तापोळा, बामणोली परिसरात पर्यटकांची गर्दी

IND vs NZ, 4th ODI: भारताचा लाजिरवाणा पराभव! विराट, रोहित, श्रेयस, ऋतुराज...सर्वच फेल, न्यूझीलंडने १०० धावाही करू दिल्या नाहीत

SCROLL FOR NEXT