indian oil corporetion 
सोलापूर

इंडियन ऑइल कार्पोरेशनच्या विरोधात शेतकरी आक्रमक 

प्रमोद बोडके

सोलापूर : इंडियन ऑइल कार्पोरेशन कंपनीच्या वतीने बडोदा ते सोलापूर ही भूमिगत पाइपलाइन करत आहेत. या पाइपलाइनमुळे पालघर, सोलापूर, नगर, उस्मानाबाद यासह विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत. बाधित शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला मिळत असून पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव मोबदला दिला तसाच मोबदला आम्हालाही द्या या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. 
हेही वाचा - काय म्हणता..! सोलापुरात "मेट्रो'चे प्लॅनिंग 
पालघरच्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळाला सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काय? या प्रश्‍नावर प्रत्येक जिल्ह्यात वेगळा निर्णय व बैठका घेण्याऐवजी राज्य सरकारने यात लक्ष घालून सर्व बाधित जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना समान मोबदला द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्‍ते तथा जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी केली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या दालनात शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिगुंठा 59 हजार रुपये तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतिगुंठा पाच हजार रुपये भरपाई मिळत आहे. मूल्यांकनासाठी 2013 चा कायदा आणि भरपाईसाठी 1962 चा कायदा वापरला जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. 
हेही वाचा -आईला वाचविण्यासाठी गेलेल्या मुलाचाही मृत्यू 
नवीन भूसंपादन कायद्यात ऊर्जा विभागाचा समावेश आहे. ऊर्जा विभागात इंधन वाहिनीचा समावेश आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना नवीन कायद्यानुसारच भरपाई मिळावी, अशी ठाम मागणी उमेश पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी शेतकऱ्यांचा लढा उभा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT