Solapur
Solapur  sakal
सोलापूर

Solapur : मंगळवेढ्यात कडब्याच्या 'बलमी' रचायची लगबग ; शेतकऱ्यांना अवकाळीची व चारा टंचाईची भीती

महेश पाटील

सलगर बुद्रुक : हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवल्याने व भविष्यातील चारा टंचाईच्या भीती पोटी ज्वारीच्या कडब्याची साठवणूक प्रक्रिया जोरात सुरू आहे.कडब्याची जुळवाजुळव केली जात आहे.पावसात भिजू नये म्हणून कडब्याच्या बलमी लावल्या जात आहेत.त्यासाठी विशेष मजुरांना मागेल तेवढी मजुरी देऊन कामावर लावले जात आहे.

अवकाळीची शक्यता- राज्यात अवकाळीची परिस्थिती आहे.त्यामुळे कडबा भिजून खराब होईल या भीतीने शेतकरी बलमी रचून घेत आहेत.एका बलमीत 1 हजार ते दीड हजार पर्यंत कडबा रचला जातो.त्यामुळे राणात पडलेला कडबा गोळा करून बलीम रचण्याची लगबग मंगळवेढ्यात सुरू आहे.

चारा टंचाईची भीती - गेल्या मोसमात पावसाअभावी ज्वारीचा कडबा कमी आला.त्यातच सांगली पुणे कोल्हापूर चे व्यापाऱ्यांना मंगळवेढ्यातील कडब्याची चढ्या दराने विक्री सुरु आहे.त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमुळे येणारे कांही महिने जिकिरीचे जाणार आहेत.हे लक्षात घेवुन शेतकरी मिळेल त्या दराने कडबा विकत घेऊन बलमी लावत आहेत. व भविष्यातील चारा टंचाई दूर करत आहेत.

मजुरांची वाणवा - बलमी लावण्यासाठी जुन्या जाणकार 50 ओलांडलेल्या मजुरांची आवश्यकता असते.नवीन मजुरांना बलमी लावता येत नाहीत.जरी लावल्याच तरी पावसापासून कडब्याचे संरक्षण नीट होत नाही.पावसाळ्यात कडबा भिणून खराब होऊ शकतो.त्यामुळे ज्यांना बलमी लावण्याचा हातखंडा आहे अश्या मजुरांची वाणवा आहे.गावात पाच ते दहा लोकं सापडतील.त्यामुळे मागेल तेवढी हजेरी देऊन त्यांना बोलवून बलीम लावली जात आहे.त्यामुळे बलीम लावणाऱ्या मजुरांना सुगीचे दिवस आले आहेत.

राजाराम जाधव,शेतमजूर सलगर बुद्रुक-मी गेल्या पन्नास वर्षांपासनं बलीम लावण्याचे काम करतुया.माझ्याकडे रोज पाच धा जण येत्याती.पण एकटा माणूस जाणार कुठं कुठं.आमच्या गावात मला धरून धा पाच जण आस्तिली बलमी लावणारी माणसं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT