Dr. Babasaheb Deshmukh sakal
सोलापूर

Sangola News : सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सोमवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सांगोल्यातील मार्केट समितीच्या मैदानावर सोमवारी (ता. 11) रोजी सकाळी आकरा वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दत्तात्रय खंडागळे

सांगोला - शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सांगोल्यातील मार्केट समितीच्या मैदानावर सोमवारी (ता. 11) रोजी सकाळी आकरा वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी शेकाप पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी गायकवाड हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली आहे.

सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून जाहीर झाला आहे. तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता मोठी असून शेतकऱ्यांसमोर चारा व पाणी टंचाईचे मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. जनावरांच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभिर बनला आहे.

येणाऱ्या काळामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढणार असून या दुष्काळी पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात यासाठी हा शेतकरी मेळावा आयोजीत केला आहे. दुष्काळातही शेतकरी आपली उपजीविका दुग्ध व्यवसाय करत असून दुधाचे दर वाढवावे व पशुखाद्याचे दरा कमी करणेबाबत सरकारकडे मागणी केली जाणार आहे.

दुष्काळामध्ये वीज दरामध्ये सवलत देण्यात यावी, टेंभू - म्हैसाळ योजनेच्या पाण्याने नदीकाठचे बंधारे भरले जावेत अशा अनेक मागण्या केल्या जाणार आहेत. या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे, सामान्य नागरिकांचे प्रश्न सरकार दरबारी सोडवण्यासाठी हा शेतकरी मेळावा घेतला असून या मेळाव्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने सोमवारी (ता. 11) रोजी उपस्थित राहावे असे आवाहनही पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

डॉ. अनिकेत देशमुख यांचा मेळाव्याला पाठिंबा नाही -

शेकाप पक्षाच्या वतीने शेतकरी मेळाव्यासाठी अगोदर पंधरा दिवस गावभेटीद्वारे वातावरण निर्मिती करून मेळावे घेण्यात येतात. परंतु पावेळी असे न करता अचानकपणे काही जणांनी ठरवून मेळाव्याचे आयोजन केले आहे. माझा या मेळाव्याला पाठिंबा नसल्याचे स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. डॉ. अनिकेत देशमुख यांच्या पोस्टमुळे वादाची ठिणगी पडल्याने या मेळाव्याकडे शेकापबरोबर विरोधकांचेही लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT