सोलापूर

आऊटसोर्सिंगद्वारे कर्मचाऱ्यांना नोकरी देताना पदवीधरांना प्राधान्य देण्याच्या वित्त विभागाच्या सूचना 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः शासनाने आऊटसोर्सिंगद्वारे कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून हे कर्मचारी सरकारला पुरविले जातात. मात्र, ते पुरवित असताना पदवीधरांकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे आल्या होत्या. त्यामुळे आता आऊटसोर्सिंगद्वारे कर्मचारी घेताना पदवीधरांना प्राधान्य देण्याच्या सूचना वित्त विभागाने दिल्या आहेत. 
प्रशासनावरील खर्च आटोक्‍यात ठेऊन विकास कामांसाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शक्‍य असेल तिथे नवीन पदनिर्मिती न करता सहजरित्या जी कामे बाह्य यंत्रणेकडून करुन घेता येतील अशी कामे बाह्ययंत्रणेकडून (संस्था, ठेकेदार) करुन घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून नोकरीची संधी उपलब्ध करुन 2018 मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यासाठी मंजूर असलेल्या रिक्त पदावर बाह्ययंत्रणेद्वारे उमेदवाराची नेमणूक करण्याच्या शासनाच्या प्रचलित धोरणामधून पदवीधर अंशकालीन उमेदवारांना सूट देऊन त्यांना वैयक्तिकरीत्या प्राधान्याने नेमणूक देण्याचा निर्णय घेतला होता. पण, तसे होताना दिसत नसल्यामुळे शासनाने पत्र काढून पदवीधरांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता त्याची अंमलबजावणी होते का? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT