Fire at Khatavkar Mall in Mangalvedha Burn material worth crores fire accident  sakal
सोलापूर

Solapur Fire Accident : मंगळवेढ्यातील खटावकर माॅलला आग; कोट्यवधीचे साहित्य जळून खाक

पंढरपूर मंगळवेढा रोडवर हे माॅल असून मॉलला लागलेल्या आगीमुळे लगत असलेल्या एस डी मार्ट व अमर फर्निचर व याशिवाय लगतच्या व्यापारी गाळ्याचे यामध्ये नुकसान

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : शहरातील पंढरपूर रोडवर असलेल्या खटावकर माॅलला लागलेल्या आगीत कोट्यावधीचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले असून आग विझवण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा येथील अग्निशामक दल पाचारण करण्यात आले.

पंढरपूर मंगळवेढा रोडवर हे माॅल असून मॉलला लागलेल्या आगीमुळे लगत असलेल्या एस डी मार्ट व अमर फर्निचर व याशिवाय लगतच्या व्यापारी गाळ्याचे यामध्ये नुकसान झाले. शहरात या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे माॅल लगतच्या व्यापाऱ्यांनी आपल्या माल बाजूला नेण्याचे प्रयत्न केला आहे.

शेजारी एस डी मार्ट नावाचा मॉल असून तो मॉल बंद असला आत कोट्यावधीचा माल पडून आहे.आगीचे कारण अद्याप समजले नसले तरी आगीच्या भक्षस्थानी मात्र जीवनावश्यक वस्तूचा अनेक साहित्य पडले आहे.

नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात उसळली आहे घटनास्थळी उपभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम उपस्थित आहेत शहरांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागण्याची पहिलीच घटना असल्याने घराच्या बाहेरून विजापूर व सोलापूर येथे जाणारे नागरिक देखील फोन करून घटनेबद्दल विचारणा करीत आहेत.

खटावकर मॉलमध्ये सर्व साहित्य एका ठिकाणी मिळत असल्यामुळे शहर व परिसरा परिसरातील नागरिकांची मोठी पसंती त्याला होते परंतु हा माॅल आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे नागरिकांत देखील हळूहळू व्यक्त केले जात आहे.

दुपारनंतर पंचनामा झाल्यानंतर आगीचे कारण व नुकसानीची आकडेवारी समोर येईल. या मार्गावर व्यावसायिक दुकाने वाढल्यामुळे या माॅल शेजारी अनेक दुकाने आहेत त्यामुळे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT