1Corona_93_0.jpg 
सोलापूर

निर्बंध पाळा अन्यथा आता थेट कारवाई ! शहर-जिल्ह्यातील 65 हजार 478 जणांना झाली कोरोनाची बाधा; आज दहा मृत्यू तर वाढले 650 रुग्ण

तात्या लांडगे

सोलापूर : शहर-जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सोमवारी (ता. 5) शहरात 202 तर ग्रामीणमध्ये 448 रुग्णांची वाढ झाली असून सध्या सात हजार 194 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. आज शहरातील सहा तर ग्रामीणमधील चौघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी कोरोनासंबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते यांनी केले आहे.

ठळक बाबी... 

  • - शहर-जिल्ह्यातील 65 हजार 478 जणांना झाली कोरोनाची बाधा 
  • - आतापर्यंत 56 हजार 265 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • - शहरातील 763 तर ग्रामीणमधील 1256 जणांचा झाला कोरोनामुळे मृत्यू 
  • - आज शहरात वाढले 202 रुग्ण तर सहाजणांचा मृत्यू; ग्रामीणमध्ये वाढले 448 रुग्ण तर चौघांचा मृत्यू 
  • - शहरातील 154 ठिकाणी आढळले रुग्ण; प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंधाची अंमलबजावणी नाहीच 

मागील वर्षी एप्रिल महिन्यात सोलापुरात प्रवेश केलेल्या कोरोनाला आता एक वर्षाचा कालावधी पूर्ण होणार आहे. शहर-जिल्ह्यातील आठ लाखांहून अधिक संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यापैकी एकूण 65 हजार 478 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील दोन हजार 19 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करूनही त्यांच्याकडून नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांनी, महापालिका प्रशासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन करूनही तसेच चित्र दिसून येत आहे. त्यावर उपाय म्हणून आता राज्य सरकारच्या माध्यमातून कडक निर्बंध लागू करण्यात आले असून त्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत असणार आहे. आता रात्री आठनंतर नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही. अन्यथा पोलिसांच्या माध्यमातून संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. 

तालुकानिहाय वाढलेले रुग्ण 
अक्‍कलकोट (7), बार्शी (80), करमाळा (77), माढा (69), माळशिरस (87), मंगळवेढा (18), मोहोळ (20), उत्तर सोलापूर (14), पंढरपूर (60), सांगोला (13) आणि दक्षिण सोलापूर (3). 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT