shivsena
shivsena 
सोलापूर

माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे म्हणतात, आमदार तानाजी सावंत देऊ शकतील शिवसेनेला उभारी 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे हे शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत. महेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे महाराष्ट्रातील विशेषत: महाविकास आघाडीतील वातावरण ढवळून निघाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी सोलापुरातील शिवसेनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांवर आगपाखड केली आहे. सोलापूरचे संपर्कप्रमुख माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी लक्ष घातल्यास सोलापूरच्या शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी येईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत करमाळ्यातून रश्‍मी बागल, बार्शीतून दिलीप सोपल, मोहोळमधून नागनाथ क्षीरसागर, सोलापूर शहर मध्यमधून माजी आमदार दिलीप माने, सांगोल्यातून माजी आमदार शहाजीबापू पाटील अशी तगडी मंडळी आमदार तानाजी सावंत यांनी मैदानात उतरविली, परंतु पक्षांतर्गत कलह, काही माजी पदाधिकारी व भाजपच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांनी शिवसेनेला रोखण्याचे काम केले. त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेसाठी विधानसभेचे निकाल चिंताजनक लागले. या निवडणुकांमध्ये सोलापूरच्या शिवसेनेतील काही जुन्या मंडळींनी शिवसेनेतील काही बड्या नेत्यांना हाताशी धरून आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेची घोडदौड रोखण्यासाठी कटकारस्थान केल्याचा आरोपही माजीमंत्री खंदारे यांनी केला आहे. 

अत्यंत किरकोळ कारणावरून लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांना जिल्हा सहसंपर्कप्रमुख पदावरून हटविण्यात आले. याशिवाय माझ्यासह माजी राज्यमंत्री दिलीप सोपल, नागनाथ क्षीरसागर, साईनाथ अभंगराव, रश्‍मी बागल, माजी आमदार दिलीप माने, हरिभाऊ चौगुले, प्रा. शिवाजी सावंत, प्रा. अजय दासरी यांच्यासह अनेकांना पक्ष संघटनेपासून दूर ठेवून पुन्हा नवे बदल घडवून आणले व मनमानी सुरू केल्याचा आरोपही माजीमंत्री खंदारे यांनी केला आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या ताकदीचा करीश्‍मा दाखवणारे महेश कोठे हेदेखील शिवसेनेत नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील शिवसेनेचे सध्याचे पदाधिकारी कोणालाही विश्वासात घेत नाहीत. कसलाही संपर्क ठेवत नाहीत. त्याचा अनिष्ट परिणाम पक्ष संघटनेवर होत असल्याचेही माजीमंत्री खंदारे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT