Mucormycosis
Mucormycosis Esakal
सोलापूर

"म्युकरमायकोसिस'चे कर्नाटकातील 40 रुग्ण उपचारासाठी सोलापुरात !

तात्या लांडगे

परजिल्ह्यातील व परराज्यातील 75 रुग्ण असल्याने जिल्ह्यातील या आजाराची रुग्णसंख्या जास्त दिसत असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिले आहे.

सोलापूर : कोरोनानंतर (Covid-19) म्युकरमायकोसिसचा (mucormycosis) धोका वाढू लागला असून, सद्य:स्थितीत शहरातील 26 तर ग्रामीणमधील 156 जणांना या आजाराची बाधा झाली आहे. तर बीड (Beed), लातूर (Latur), उस्मानाबादसह (Osmanabad) अन्य जिल्ह्यांतील 35 आणि कर्नाटकातील (Karnataka) 40 रुग्णांवर सोलापुरातील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 79 रुग्ण बरे झाले असून 21 जणांचा या आजाराने बळी घेतला आहे. (Forty patients from Karnataka are undergoing treatment for mucormycosis in Solapur)

कोरोना काळात अधिक दिवस व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजनवर राहिलेल्या रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर औषधांचा वापर झाला आहे. मधुमेह झालेल्या रुग्णांची शुगर वाढल्यानंतर म्युकरमायकोसिस या आजाराला निमंत्रण मिळत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. सोलापूरसह शेजारील जिल्हे व राज्यातही या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले आहेत. सध्या 185 रुग्णांवर सोलापुरातील विविध रुग्णालयांमध्ये विशेषत: श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परजिल्ह्यातील व परराज्यातील 75 रुग्ण असल्याने जिल्ह्यातील या आजाराची रुग्णसंख्या जास्त दिसत असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य विभागाने दिले आहे. मात्र, जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण 8 मे रोजी आढळला आणि त्यानंतर 20 दिवसांत एवढी रुग्णवाढ झाल्याने चिंता वाढली आहे. सर्वोपचार रुग्णालयात सर्वच आजारांवर निदान होत असल्याने त्या ठिकाणी सर्वाधिक 40 हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. आजार होऊ नये म्हणून कोरोनामुक्‍त रुग्णांनी किमान दोन महिन्यांपर्यंत वेळोवेळी त्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केली आहे.

रुग्णांची सद्य:स्थिती...

  • एकूण रुग्ण : 285

  • बरे झालेले रुग्ण : 79

  • एकूण मृत्यू : 21

  • उपचार घेणारे रुग्ण : 185

जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचा प्रसार रोखण्यासाठी 31 मे ते 5 जून या काळात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील 182 तर परजिल्ह्यातील व परराज्यातील 75 रुग्णांना या आजाराची बाधा झाली आहे. त्यातील 79 रुग्ण बरे झाले असून आता 185 रुग्ण उपचार घेत आहेत.

- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT