crime  sakal
सोलापूर

नजीक पिंपरीत एकाच वेळी चार घरफोडया; पाच लाखाचा ऐवज लंपास

राजकुमार शहा

मोहोळ(सोलापुर) : नजीक पिंपरी ता मोहोळ येथे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री चार ठिकाणी घरफोड्या केल्या. ही घटना सोमवार ता 18 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने व दुचाकीसह सुमारे पाच लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी मोहोळ पोलिसात अज्ञात चोरटया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नजीक पिंपरी येथील निवृत्ती दत्तात्रय वाघमोडे हे मसाल्याचे व्यापारी आहेत. 17 ऑक्टोंबर रोजी ते पत्नी, मुला बाळांसह आई वडील राहत असलेल्या घरी मुक्कामी गेले होते. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण एक लाख 85 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

सिद्राम गोविंद वाघमोडे यांचीही घरफोडी झाली असून चोरट्यांनी एक मोबाईल ,3 तोळे सोने चोरुन नेले आहे. त्याच प्रमाणे दिलीप हुकुम वाघमोडे यांच्या घराचे कुलूप तोडुन दोन लाख रुपये रोख रक्कम, पाच तोळे सोन्याचे दागिने व 60 ग्रॅमचे चांदीचे दागिने लंपास केले. तर फुलचंद शिवाजी मेटकरी यांची होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल चोरुन नेली आहे. सोमवारी सकाळी घरफोडीच्या घटना उघडकीस आल्याने नजीक पिंपरी गावात एकच खळबळ उडाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी करून चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

या प्रकरणी निवृत्ती दत्तात्रय वाघमोडे यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असुन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री चार घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT