सोलापूर विभागातील 3900 एसटी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत ! Esakal
सोलापूर

सोलापूर विभागातील 3900 एसटी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत !

सोलापूर विभागातील 3900 एसटी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत !

विजय थोरात

राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत चालली आहे. डिझेलला पैसे नाहीत, कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास पैसे नाहीत.

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाची (State Transport Corporation) आर्थिक स्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत चालली आहे. डिझेलला (Diesel) पैसे नाहीत, कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास पैसे नाहीत... अशा एक ना अनेक अडचणींना एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employees) सामोरे जावे लागत आहे. दर महिन्याला वेतन मिळते की नाही, अशी चिंता कर्मचाऱ्यांना मागील दीड वर्षापासून लागून राहिली आहे. दरम्यान, जुलै महिन्याचे ऑगस्ट महिन्यात सात तारखेला मिळणारे वेतन अद्याप झाले नसल्याने सोलापूर विभागातील 3 हजार 900 एसटी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनाची अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागात एकूण 3 हजार 900 कर्मचारी कार्यरत आहेत. यात 1 हजार 300 चालक, 1 हजार 300 वाहक व 1 हजार 300 इतर प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. सोलापूर विभागात एकूण नऊ आगार आहेत. सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी एसटीचे महिन्याला लाखो रुपये खर्च होतात. परंतु मागील दीड वर्षापासून वेतन होते की नाही अशी चिंता प्रत्येक महिन्यात कर्मचाऱ्यांना वाटत आहे. कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. तेव्हापासून एसटीच्या संचित तोट्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती हलाखीची बनली आहे. एसटीचे शासनात विलिनीकरण करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. एसटीचे शासनात विलिनीकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील काही संघटनांनी दिला आहे.

ज्याप्रमाणे शासनाने राज्यातील विविध 31 महामंडळांतील कार्यरत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे, मग एसटी महामंडळाचा समावेश का केला जात नाही, असा सवाल उपस्थित होत असताना, एसटी महामंडळ तोट्यात असल्याचे कारण शासनाकडून पुढे केले जात आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील लोकांची जीवनवाहिनी म्हणून एसटीला ओळखले जाते. एसटीच्या प्रवासावर लोकांचा मोठा विश्वास आहे. मात्र शासन याकडे दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्न कामगार संघटनांनी उपस्थित केला आहे.

कोरोनामुळे (Covid-19) मागील दीड वर्षापासून एसटी कर्मचाऱ्यांचे सात तारखेला होणारे वेतन वेळेवर होत नसल्याने कर्मचाऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महिनाभर काम करून देखील वेतनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोनामुळे एसटीची प्रवासी वाहतूक कधी सुरू तर कधी बंद होत असल्याने राज्य परिवहन महामंडळाकडे वेतन देण्यासाठी देखील पैशांची चणचण भासत असल्याने याचा कर्मचाऱ्यांना फटका बसत आहे.

आकडे बोलतात...

  • सोलापूर विभागातील एकूण कर्मचारी : 3 हजार 900

  • एकूण चालक : 1 हजार 300

  • एकूण वाहक : 1 हजार 300

  • प्रशासकीय कर्मचारी : 1 हजार 300

एसटी कर्मचाऱ्यांचे सात तारखेला वेतन अधिनियमन कायद्याने क्रमप्राप्त असताना देखील अद्यापही कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर वेतन अदा करावे, जेणेकरून कर्मचाऱ्यांची उपासमार होणार नाही.

- श्रीकांत शड्डू, महाराष्ट्र एसटी कॉंग्रेस इंटक संघटना, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT