Agitation 
सोलापूर

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकाच्या खुर्चीला घातला शाल, श्रीफळ व फेट्याचा आहेर !

विश्वभूषण लिमये

सोलापूर : जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अठरा तासांत सोलापूर ते विजयपूर मार्गावर 25 किलोमीटर रस्ता पूर्ण करत रस्ते निर्मितीचा रेकॉर्ड ब्रेक केला होता. मात्र दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्‍यातल्या टेंभुर्णी गावातून जाणाऱ्या सोलापूर - पुणे महामार्गाचे काम तब्बल पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे संतापलेल्या टेंभुर्णीवासीयांनी चक्क राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन गांधीगिरी स्टाईलने आपला निषेध व्यक्त केलाय. 

विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कार्यालयात उपस्थित नसल्याने टेंभुर्णीतील शिवसेना, रयत क्रांती तसेच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीला फेटा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. 

26 मार्च 2016 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या तब्बल 25 ते 30 हजार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामांचा प्रारंभ करण्यात आला होता. त्या वेळच्या कार्यक्रम पत्रिकेत टेंभुर्णीतील रस्त्याच्या चौपदरीकरण कामाचा देखील समावेश होता. मात्र मागील पाच वर्षात या रस्त्यावरील एकही दगड हलवलेला नसल्याने टेंभुर्णीवासीयांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. 

या रस्त्यासाठी तब्बल 101 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली होती; मात्र अद्यापही काम पूर्ण न झाल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी अखेर आपला संताप व्यक्त करत गांधीगिरी पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला आहे. 

दरम्यान, प्रकल्प संचालकांना याबाबत विचारले असता त्यांनी, कामासाठी दिरंगाई झाल्याचे कबूल केले; मात्र लवकरच हे काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget 2026: 'या' लोकांसाठी अर्थसंकल्प ठरला अपूर्ण आशांची कहाणी; अपेक्षा काय होत्या, काय मिळाले? वाचा सविस्तर...

Union Budget Focus on Election-Bound States : बंगाल, आसाम, केरळसह निवडणूका होणाऱ्या राज्यांना मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून नेमंक काय मिळालं?

Mumbai News: टिळक पुलाचे ७० टक्के काम पूर्ण, २०२६ अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत

Budget 2026: अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसायाला नवे बळ! कोळंबी आणि इतर मासे खाद्य स्वस्त होणार; सीफूड निर्यातीसाठी मोठा निर्णय

U19 World Cup, IND vs PAK: वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद, पण वेदांत त्रिवेदीचं झुंजार अर्धशतक; भारताचे पाकिस्तानसमोर मोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT