Gauri Ganpati 2023 gauri ganpati festival eco friendly product market solapur sakal
सोलापूर

Gauri Ganpati 2023 : मोहोळ शहरात गौराईच्या आगमना प्रित्यर्थ खरेदीसाठी महिला सरसावल्या

गुरुवारी आगमन होणाऱ्या गौराईच्या स्वागताची मोहोळ तालुक्यात जोरदार तयारी

राजकुमार शहा

मोहोळ : गेल्या दोन दिवसा पासून मोहोळ तालुक्यातील काही भागात पडणाऱ्या पावसामुळे सर्व सामान्याला थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे. "गणपतीने पाऊस आणला" अशी सर्वसामान्यांची भावना झाली आहे. त्यामुळे गुरुवारी आगमन होणाऱ्या गौराईच्या स्वागताची मोहोळ तालुक्यात जोरदार तयारी झाली आहे.

शिवाजी चौक ते लोकनेते चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फराळाच्या पदार्थांचे स्टॉल सजले आहेत, ते खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारपेठेत गर्दी झाली आहे. गौराईच्या आगमनाला ग्रामीण भागात "लक्ष्मीचा सण" म्हणून संबोधले जाते. लक्ष्मीचा सण म्हणजे मिनी दिपवाळीच.

लक्ष्मी आपल्या घरात कायम राहावी यासाठी तिच्यापुढे हजारो रुपये खर्च करून विविध फळांच्या साहित्यांच्या प्लेट, खेळणी, सफरचंद, मोसंबी, चिकू,या फळांचीही मांडणी केली जाते. अनेक आई-वडील विवाह झालेल्या मुलीला लक्ष्मीचे मुखवटे घेऊन देतात. 600 रुपया पासून एक हजार रुपया पर्यंत मुखवट्यांच्या किमती आहेत.

पूर्वी व ग्रामीण भागात आजही विविध साड्यांचा पडदा टाकून लक्ष्मीचा छत उभा करतात. मात्र त्याची जागा आता तयार छताने घेतली आहे. लक्ष्मी उभा करण्यासाठी लागणारे सांगाडे व फोल्डिंगचे पायऱ्यांचे रॅक बाजारात तयार उपलब्ध आहेत. एक हजारापासून ते पाच हजारापर्यंत तयार छतांच्या किमती आहेत.

चालू वर्षी फराळांच्या पदार्थात लाडू, म्हैसूरपाक व जिलेबी यांना मोठी मागणी असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले. दरम्यान गुरुवारी गौराईचे आगमन असल्याने ज्वेलरीच्या मंगळसूत्र, गंठण, नेकलेस व अन्य महिलांच्या दागिन्यांना मागणी आहे. श्रीमंत कुटुंब या वस्तू तात्पुरत्या स्वरूपात सोन्याच्या घालतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT