Janhit Shetkari 
सोलापूर

"जनहित'चा धसका घेत "गोकूळ'ने दिले एफआरपी व कर्मचाऱ्यांचे पीएफ जमा करण्याचे लेखी आश्‍वासन 

श्याम जोशी

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : जनहित शेतकरी संघटनेतर्फे गव्हाणीत उड्या टाकून धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकूळ साखर कारखाना बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याचा धसका घेत कारखाना प्रशासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपी व कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम 1 जानेवारीपर्यंत जमा करण्याचे लेखी आश्‍वासन संघटनेला दिल्याने होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले. 

गोकूळ साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या वर्षीची थकीत एफआरपी तसेच कारखान्यातील कामगारांच्या पगारी व पीएफची रक्कम अद्याप जमा न केल्याने जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक- अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सोमवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले होते. या निवेदनात शुक्रवार (ता. 18) गोकूळ कारखान्यावर आंदोलन करून कारखाना बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु कारखाना प्रशासनाने या आंदोलनाचा धसका घेत 28 डिसेंबरपर्यंत एफआरपीचे सर्व थकीत पैसे जमा करण्याचे व कर्मचाऱ्यांची उर्वरित देयके 1 जानेवारीपर्यंत जमा करण्याचे लेखी स्वरूपातील आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. 

या वेळी विकास जाधव, चंद्रकांत निकम, श्रीकांत नलवडे, गुंजेगावचे सुभाष पवार, विकास पाटील, रवी पाटील, वडापूरचे अण्णासाहेब वाघचौरे, संभाजी बाबर, खंडू कदम, सुनील पुजारी, धर्मराज पुजारी, सुरेश म्हमाणे, कोरवलीचे शशिकांत थोरात आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

...तर कारखाना बंद पाडू 
गेल्या तीन महिन्यांपासून जनहित संघटना आंदोलनाद्वारे सातत्याने पाठपुरावा करत आहे. तरी याबाबतीत गोकूळचे संचालक दत्ता शिंदे यांनी दखल घेऊन लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यामुळे होणारे आंदोलन थांबवले. परंतु 1 जानेवारीपर्यंत जर एफआरपीची रक्कम व कामगारांच्या पगारी जमा केल्या नाहीत, तर गोकूळ कारखान्यात घुसून कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकून कारखाना बंद पाडला जाईल. 
- प्रभाकर देशमुख, 
संस्थापक - अध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

CM Devendra Fadnavis : शिवसेना शिंदेंचीच अन् राष्ट्रवादी अजितदादांची! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर CM फडणवीसांचे भाकीत; राजकीय वर्तुळात चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर! दिल्लीतील प्रमुख ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

SCROLL FOR NEXT