umesh patil 
सोलापूर

विद्यार्थ्यांची नाराजी सरकारने घ्यावी समजून : राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटील : राजकीय लाभासाठी विद्यार्थ्यांना हाताशी धरणे अयोग्यच 

प्रमोद बोडके

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 14 मार्चला ही परीक्षा होणार होती. या परीक्षेच्या तारखा गेल्या दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. राज्य शासनाने विद्यार्थ्यांची नाराजी समजून घेणे आवश्‍यक असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

उमेश पाटील म्हणाले, अगोदर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि त्यानंतर कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा काही काळासाठी लांबणीवर गेली आहे. एमपीएससी व यूपीएससी परीक्षेची तयारी करणारे बहुतेक विद्यार्थी ग्रामीण भागातून, शेतकरी कुटुंबातून आलेले असतात. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या पाल्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे व कुटुंबाची जबाबदारी घ्यावी अशी सर्वसाधारण अपेक्षा संबंधित मुलांच्या पालकांची असते. पालकांच्या या अपेक्षांचे ओझे घेऊन विद्यार्थी एमपीएससी यूपीएससी परीक्षेची तयारी करत असतात. ही बाब राज्य शासनाच्या धोरणकर्त्यांनी लक्षात घेणे आवश्‍यक आहे 

एमपीएससी परीक्षे करिता असलेली ठरावीक वयोमर्यादा संपत आल्यानंतर, त्याचे मानसिक दडपण अनेक वर्षापासून तयारी करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर असते ही बाब देखील लक्षात घेणे आवश्‍यक आहे. संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक वाढल्याने विद्यार्थ्यांसोबतच सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या संबंधित काळजी घेणे ही देखील राज्य सरकारची जबाबदारी असते हे देखील विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे आवश्‍यक असल्याचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT