Grapes sakal media
सोलापूर

सोलापूर : द्राक्षाला हमीभावाची गरज; पावसाने उत्पादकांना आर्थिक फटका

द्राक्षाला हमीभाव नाही मिळाला तर द्राक्ष बागायतदार कोलमडून जाणार आहे.

संतोष सिरसट

उत्तर सोलापूर : केंद्र सरकार (Central Government) ज्याप्रमाणे इतर पिकांना हमीभाव देते, त्याचप्रमाणे द्राक्ष पिकालाही (Grapes Farming) हमीभाव देण्याची गरज निर्माण झाली आहे. द्राक्षाला हमीभाव नाही मिळाला तर द्राक्ष बागायतदार कोलमडून जाणार आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या पावसाने द्राक्ष उत्पादकांना मोठा आर्थिक फटका (Economic Loss) बसला आहे. या सगळ्यांचा विचार करुन हमीभावाबाबत योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्यात यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे द्राक्षाचे पीक छाटणी कोणत्या हंगामात घ्यायचे असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. लवकर, नियमित व उशिरा छाटणी केलेलेल्या बागेला ही पावसाच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांना माल आलेला नाही. ज्या ठिकाणी माला आहे तो मला पावसामुळे गळ, कुज होऊन नाहीसा झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी द्राक्ष बागायतदारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. बागायतदारांचे नुकसान टाळण्यासाठी नाशिक विभागातून द्राक्षाला हमीभाव देण्याबाबत सुरवातीला बैठक झाली. त्यानंतर राज्याच्या सर्वच विभागात त्याप्रमाणे बैठका सुरू झाल्या आहेत. सोलापूर विभागाची बैठक तीन जानेवारीला पंढरपुरात होणार आहे.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे राज्याध्यक्ष शिवाजी पवार यांनी नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी केली आहे. त्या बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. मात्र सरकारकडून त्यांच्या मागणीला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक संकट कमी करण्यासाठी द्राक्षाला ही हमीभाव मिळाला पाहिजे ही भूमिका आता द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपुरात होणाऱ्या वज्रमुठ बैठकीकडे सोलापूर विभागातील द्राक्ष बागायतदारांचे लक्ष लागले आहे.

द्राक्ष बागायतदारांची सोमवारी पंढरपुरात बैठक

यंदाच्या वर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे राज्यातील द्राक्ष बागायतदार संकटात सापडला आहे. त्यामुळे द्राक्षबागेला ही हमीभाव मिळावा, यासाठी राज्यातून उठाव सुरू झाला आहे. या पुढील वाटचाल निर्धारित करण्यासाठी येत्या सोमवारी (ता. 3) सकाळी 11 वाजता सोलापूर विभागातील द्राक्ष बागायतदार यांची वज्रमूठ बैठक पंढरपुरातील दाते मंगल कार्यालयात होणार आहे. या बैठकीला विभागातील द्राक्ष बागायतदारांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन राजाध्यक्ष शिवाजी पवार व सोलापूर विभागाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT