2Medical_Students 
सोलापूर

'वैद्यकीय शिक्षण'च्या वाढणार जागा 

तात्या लांडगे

सोलापूर : केंद्र सरकारच्या निर्णयानुसार महाराष्ट्रात नव्याने 11 वैद्यकीय महाविद्यालये सुरु होणार आहेत. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, ही वैद्यकीय महाविद्यालये खासगी भागिदारी तत्त्वावर सुरु केली जाणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वोपचार रुग्णालयांना स्पेशालिस्टसह डॉक्‍टरांचे मुनष्यबळ उपलब्ध होणार असून वैद्यकीय शिक्षणाच्या एक हजार 650 जागा वाढणार आहेत. 


खेड्यापाड्यातील आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांसह ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मागील पाच-सहा वर्षांपासून पुरेसे मुनष्यबळ उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे असून अडचण नसून खोळंबा अशी आवस्था या आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांची झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्राच्या निर्णयाने सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळाला आहे. परंतु, खासगी भागिदारी तत्त्वावर सुरु होणाऱ्या राज्यातील 11 वैद्यकीय महाविद्यालयांचे काम पूर्ण होण्यास पाच वर्षे लागतील, असा अंदाज आहे. दरम्यान, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या वतीने या वैद्यकीय महाविद्यालयांचा कृती आराखडा केंद्राला सादर केला जाणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यातील एकूण वैद्यकीय शिक्षणाच्या एक हजार 650 जागा वाढणार आहेत. त्यातून अनेकांचे डॉक्‍टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 


एक हजार 650 जागा वाढणार 
केंद्र सरकारने सार्वजनिक खासगी भागिदारी तत्त्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनशिप) वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने 11 महाविद्यालयांचा प्रस्ताव दिला आहे. त्यातून शासकीय सर्वोपचार रुग्णालयांना पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल. नव्या महाविद्यालयांमुळे राज्यात एक हजार 650 जागा वाढतील. 
- डॉ. तात्याराव लहाने, अतिरिक्‍त संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई 


या जिल्ह्यांमध्ये होणार वैद्यकीय महाविद्यालये 
सातारा, नंदूरबार, मुंबई, अलिबाग, पालघर, सिंधुदूर्ग, अमरावती, बुलढाणा, नाशिक, उस्मानाबाद व परभणी या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये सुरु होणार आहेत. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने केंद्राला तसा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार आता या जिल्ह्यांमध्ये सर्वोपचार रुग्णालयांना जोडून स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालये सुरु होणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Strike : सरकारी कर्मचारी, शिक्षकांचा बेमुदत संप तुर्तास स्थगित मात्र 11 नोव्हेंबरला करणार निदर्शने आंदोलन!

माधवी खंडाळकर कुणाच्या सांगण्यावरून बोलत आहेत? राष्ट्रवादीतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर; रुपाली ठोंबरेंचे चाकणकरांवर गंभीर आरोप

Crime: जावयानं माझ्या मुलीला मारलं, सासूची तक्रार... मात्र सत्य समोर आल्यानंतर तोंड लपवावं लागलं, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : शरद पवार गटाचे माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे अजित पवारांच्या भेटीला

Pune Crime: आधी खून मग लोखंडी भट्टीमध्ये पत्नीचा मृतदेह जाळला; पुण्यातल्या वारजे भागात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT