HospiBuz_Covid-19-Breakthrough-compressor.jpg 
सोलापूर

शहरातील आठ प्रभागांमध्येच निम्मे रुग्ण ! आज 28 पॉझिटिव्ह अन्‌ एकाचा मृत्यू 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील नऊ हजार 72 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कातील 28 हजार 262 संशयितांना त्यांच्या घरातच क्‍वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील 82 संशयित आता होम क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर 14 हजार 213 पैकी 90 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. आज शहरात 20 पुरुष, तर आठ महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना करुनही प्रभाग क्रमांक पाच, सात, आठ, 21, 23, 24, 25 आणि 26 मध्ये सर्वाधिक चार हजार 364 रुग्ण आढळले आहेत. अन्य प्रभागांच्या तुलनेत ती संख्या मोठी आहे.

ठळक बाबी... 

  • शहरातील 86 हजार 101 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरातील 77 हजार 29 संशयितांची टेस्ट निगेटिव्ह 
  • शहरात आतापर्यंत आढळले नऊ हजार 72 कोरोना पॉझिटिव्ह 
  • एकूण रुग्णांपैकी 503 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी 
  • आतापर्यंत सा हजार 706 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • आज 428 संशयितांमध्ये आढळले; आसरा हौसिंग सोसायटीतील 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू 


लकी चौक, देगाव, दत्त चौक, निरामय सोसायटी (अशोक नगर), राघवेंद्र नगर (सैफूल), विजय देशमुख नगर (विजयपूर रोड), आरुष रेसिडेन्सी, अनुराधा को-ऑप हौसिंग सोसायटी, केगाव, अवंती नगर, वज्रेश्‍वरी नगर (अक्‍कलकोट रोड), मल्लिकार्जुन नगर, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), बॉम्बे पार्क (जुळे सोलापूर), दिलीप नगर (कुमठे), कुमठे गाव, सुरवसे मित्र नगर, एसबीआय कॉलनी (दयानंद कॉलेजवळ), मंत्री चंडक (किल्लेदार मंगल कार्यालयाजवळ), चंद्रकिरण अपार्टमेंट (रेल्वे लाईन्स) या ठिकाणी नवे रुग्ण आढळले आहेत. शहरात आता को-मॉर्बिड तथा संशयित, लक्षणे असलेल्यांचीच कोरोना टेस्ट केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

मला वाईट वाटतं, मी का बोलले नाही.. प्रथा म्हणून डोहाळे जेवणात घडलेली ती गोष्ट; मृणाल कुलकर्णी आजही विसरलेल्या नाही

Tablet For Students: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार टॅबलेट! मुख्यमंत्र्यांचा निर्णय, DBTद्वारे थेट खात्यात रक्कम

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

SCROLL FOR NEXT