nisarg raigad.jpg
nisarg raigad.jpg 
सोलापूर

सोलापूरच्या हिरकणी पोहोचल्या रायगडावर 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर,:  शहर व परिसरातील 18 शिवप्रेमी महिलांनी किल्ले रायगडावर पदभ्रमण मोमीम करून शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगळ्या वेगळ्या पध्दतीने शिवजयंती साजरी केली. 
निसर्ग संवर्धनासाठी कृतिशील कार्य करणाऱ्या 'निसर्ग माझा सखा' संस्थेच्या वतीने 'गड-किल्ले भ्रमंती' या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी किल्ले रायगड पदभ्रमण' मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत एकूण 51 जण सहभागी झाले होते. 
शूरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज शीतलताई मालुसरे यांच्या सानिध्यात रायगड भ्रमंती करण्यात आली. शीतलताई मालुसरे यांच्या हस्ते 'निसर्ग माझा सखा'ने आयोजित केलेल्या 'छत्रपतींची आज्ञापत्रे' या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आणि परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या मोहिमेमध्ये अश्विनी इरण्णा गोब्बूर, पल्लवी म्हेत्रे, विद्या भोसले, प्रियांका चाबुकस्वार, वैशाली डोंबाळे, मीनाक्षी हावशेट्टी, रेखा नागणसुरे, रेणुका जोकारे, ज्योत्स्ना घोडके, भावना चाबुकस्वार, कविता बोलदे, सुवर्णा गंगोंडा, कस्तुरी शरणप्पा माशाळकर, कावेरी बसवराज डबरे, कृतिका शांतप्पा गंगोंडा, राधिका चंबार, रक्षिता शरणप्पा फुलारी, अदिती कामतकर, आरोही कामतकर, रत्नप्रभा बसाटे या महिलांसह त्यांच्या कुटुंबियांचा समावेश होता. 

या विद्यार्थ्यांचा सहभाग 
नागणसूर कन्नड शाळेची विद्यार्थिनी कृतिका व कस्तुरी गंगोंडा, कावेरी डबरे, राधिका चांभार, रक्षिता व रोहित फुलारी आणि आयएमएस शाळेचा विद्यार्थी आदित्य कामतकर यांनी 'छत्रपतींची राजमुद्रा' तोंडपाठ करून उपस्थितांना ऐकवली. 

विजेते स्पर्धक 
'छत्रपती शिवरायांची आज्ञापत्रे' या विषयावरच्या निबंधस्पर्धेत प्रा. सोनाली गिरी, अश्विनी गोब्बूर, श्रुती चाबुकस्वार, पंचानाथ शरणार्थी आणि शुभम आवटे हे विजेते ठरले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT