historical heritage of mangalwedha is bhuikot fort neglected solapur sakal
सोलापूर

मंगळवेढ्याचा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित

मंगळवेढ्यात चालुक्य, कलचुरी घराण्याची काही काळ राजधानी होती काळापासून शहराचे ऐतिहासिक महत्त्व आहे

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : पुरंदरचा तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेकडील मोहिमेसाठी जाताना शहरानजीकच्या कृष्ण तलावालगत शिवाजी महाराजांसह सैन्याचा पदस्पर्श लाभलेला परिसर व शहरातील भुईकोट किल्ला दुर्लक्षित आहे नव्या महामार्गामुळे वाहतूकीत वाढ झाली झाल्याने वास्तू जतन व पर्यटन वाढीसाठी लक्ष देण्याची गरज आहे.

मंगळवेढ्यात चालुक्य, कलचुरी घराण्याची काही काळ राजधानी होती काळापासून शहराचे ऐतिहासिक महत्त्व आहे. आदिलशाही साम्राज्याचे मंगळवेढा प्रवेशद्वार होते. पुरंदरचा तह झाल्यानंतर विजापूरच्या आदिलशाहीच्या जवळकीमुळे मंगळवेढा हे ठिकाण त्या काळात महत्त्वाचे होते. 1665 मध्ये शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्या सोबत आदिलशाही विरुद्ध मोहीम काढली फलटण - खटावमार्गे मंगळवेढ्याकडे येत असताना महाराजांनी नेताजी पालकरांना मंगळवेढा किल्ला ताब्यात घेण्यासाठी पुढे पाठवले नेताजीने मंगळवेढा किल्ला जिंकला.दरम्यान शिवाजी महाराजांनी सोबतच्या घोडदळ व पायदळाबरोबर कोसभर अंतरावर असलेल्या कृष्ण तलावावर पाण्याची सोय व सुरक्षित ठिकाण असल्याने ते थांबल्याचे काही इतिहासकारांनी पुस्तकात नमूद केले.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे 20 डिसेंबर 1665 ला मंगळवेढा किल्ल्यात महाराजांनी प्रवेश केला. 27 डिसेंबर पर्यत हा भुईकोट किल्ला व बाहेर 13 बुरूज आणि तटबंदी असल्याने सुरक्षित ठिकाण म्हणून किल्ल्यात मुक्काम केला. हा किल्ला विजापूरच्या जवळ असल्याने तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे मिर्झाराजे जयसिंगाने दिलेरखानाला किल्ला उद् ध्वस्त करण्याची आज्ञा केली. पुढील काळात मंगळवेढे पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेले. 1685 मध्ये औरंगजेब बादशाहाच्या बक्षीने उद्ध्वस्त झालेला किल्ला ताब्यात घेतला. साधारणत: 200 वर्षांपूर्वी डागडुजी करण्यात आली. सध्या किल्ल्याचे फारच थोडे अवशेष उरलेले आहेत. अनेक ऐतिहासिक प्राचीन अवशेष गावात विखुरल् याने किल्ल्याचे महत्त्व कमी झाले. आताच्या स्थितीत उभी असलेली वास्तू म्हणजे किल्ले वजा गढी आहे. चार मातीचे बुरुज आहेत. किल्ल्याचा खंदक नष्ट झालेला आहे. किल्ल्यात एका कोपर्‍यात काही कोरलेल्या मूर्ती, सप्त मातृकांची मूर्ती, गणपतीची मूर्ती पाहायला मिळतात. किल्ल्याच्या आताच्या अवशेषांवरून किल्ला आता आहे त्यापेक्षा मोठा असल्याचे संकेत मिळतात. परंतु सध्या बुरुजाची पडझड होत असल्याने याकडे दुर्लक्ष केल्यास हा ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढीस पाहण्यास मिळणार नाही.

जलयुक्त शिवार मोहिमेत या तलावात कृष्णाचे मंदिर आढळून आले. जुन्या काळातील मूर्ती सापडल्या.सापडलेल्या मूर्ती काही संशोधकांनी इतरत्र नेल्या तर काही पालिकेत ठेवल्या.त्या वस्तू एकत्रित करुन वस्तुसंग्राहय उभा करणें गरजेचे आहे.

शहरातील किल्ला व ऐतिहासिक मूर्तींचे जतन करण्यासाठी शासनाने नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बृहद आराखडा तयार करावा व वस्तू संग्रहालय करावे. पर्यटकांसाठी राहण्याची व निवासाची सोय झाल्यास पर्यटकांचा ओढा वाढू शकेल तलावातील गाळ काढल्यानंतर अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून या परिसरामध्ये वृक्षलागवड करण्यात नागरिकांच्या व दामाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेवाच्या विद्यार्थांच्या माध्यमातून 103 विविध प्रकारची 4700 वृक्षांची लागवड केली.विविध वृक्षसंपदेमुळे परिसराचे सौंदर्य वाढले.पण याकडे देखील सध्या दुर्लक्ष झाले. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था व पर्यटकांचा ओढा वाढू शकतो मात्र कृष्ण तलावाचा परिसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असून जि प ने देखील याकडे दुर्लक्ष केले आहे जि.प.ने इतर तालुक्यात ऐताहासीक वस्तू जतन करण्यासाठी कोटयावधीचा निधी दिला मात्र मंगळवेढयाकडे मात्र दुर्लक्ष केले त्यामुळे जि. प.ने तीर्थक्षेत्र विकास आराखडा प्रमाणे पर्यटन विकास आराखडा तयार करावा. तलावापर्यंत रस्ता व संरक्षक भिंत, तसेच विशेष निधीची तरतूद केल्यास या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

किल्ल्याची जबाबदारी राज्य की केद्र शासनाची? हे निश्‍चित करून किल्ल्याची भिंत 13 फूट रूंद असल्याने त्यावर स्लॅब टाकून किल्ला वरून पाहता येईल अशी व्यवस्था करावी. तालुक्यात विस्कटलेल्या पुरातन मूर्ती एकत्रित जतन केल्यास तालुक्याचा इतिहास पुढील पिढीस माहिती होईल. कारागृह, भूमी अभिलेख, प्रांताधिकाथी, सार्वजनिक बांधकाम या कार्यालयांची दुरुस्ती होते. त्याप्रमाणे ऐतिहासिक किल्ल्याचा ठेवा जपण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे.

ऐतिहासिक वास्तू जतन करण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन मंडळातून यामध्ये कोणत्या कामासाठी निधी उपलब्ध करता येतो याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी करू.

-अजित जगताप सदस्य जिल्हा नियोजन मंडळ

महामार्गासाठी केंद्र सरकारने कोट्यवधीचा निधी दिल्यामुळे तालुक्याचे सौंदर्य वाढले आता पर्यटनवाढी साठी केंद्राने मदत करावी म्हणून आ.समाधान आवताडे,व खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे विनंती करणार आहे.

-शशिकांत चव्हाण जिल्हा संघटन सरचिटणीस भा.ज.पा.

कृष्ण तलावाचा परिसर हा ग्रामपंचायत हद्दीत असल्यामुळे जि.प.ने परिसर विकासासाठी शेतकऱ्यांच्या क्षारपड जमिनीचे नुकसान टाळून ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी निधीची तरतूद करावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करणार आहे.

-सिद्धेश्वर आवताडे अध्यक्ष खरेदी विक्री संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT