shivsena poster.jpg 
सोलापूर

शिवसेनेच्या पोस्टरमध्ये औषधी व डोसेजच्या माहितीवर आयएमएचा आक्षेप 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः राज्य शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या संदर्भात शिवसेनेच्या पोस्टरमध्ये थेट औषधाची नावे व डोसेजची माहिती देण्याच्या प्रकारावर आयएमए राज्य संघटनेने या वर आक्षेप घेतला आहे. 

येथील हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुदीप सारडा यांनी आयएमएच्या आक्षेपांच्या बाबत माहिती दिली. 
या मोहिमेच्या संदर्भात शिवसेनेच्या वतीने एक पोस्टर काढण्यात आले आहे. त्यामध्ये नागरिकांनी त्यांच्यामध्ये असलेल्या कोरोना रोगाच्या लक्षणानुसार कोणती औषधी ध्यावीत याची माहीती दिली आहे. 

शिवसेनेने काढलेल्या पोस्टरवर जोरदार आक्षेप नोंदवले आहेत. नागरिकांनी स्वतःहून काही औषधे घ्यावीत असे सुचवले आहे. प्रत्यक्षात औषधी ही डॉक्‍टराकडुन प्रस्क्रिप्शनद्वारे द्यायची आहेत. भारतीय ड्रग्ज अँन्ड कॉस्मॅटिक्‍स कायद्याचे हे उल्लंघन आहे. या औषधांची जाहिरात करणे देखील भारत सरकारच्या कायद्याने चुकीचे आहे. समाजात औषधी मनानेच घेण्याच्या चुकीच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन या प्रकारामुळे मिळणार आहे. बरीच औषधे त्याच्या ब्रॅंडनेमने दिली आहेत हे तर अधिक चुकीचे आहे. यामुळे संबंधीत औषध कंपन्या अडचणीत येऊ शकतात. 
या पोस्टरमध्ये औषधांचे डोस हे योग्य नाहीत त्यामुळे त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. या पोस्टरमध्ये डेक्‍झामेथाझोन हे स्टीरॉईड आहे आणि डॉक्‍टरांच्या सल्लयाने त्याचा वापर करावा लागतो. पोस्टरमध्ये हे औषध घेण्याची वेळ संध्याकाळची दिली आहे. तेही चुकीचे आहे. मधुमेह, ऑस्टिओपोरोसिस, जीईआरडी आणि जठराची सुज असलेल्या व्यक्तींनी ही स्टिरॉईडस घ्यायची नसतात. त्याचे अतिशय गंभीर परिणाम होऊ शकतात. या पोस्टरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा लोगो वापरला आहे. अशा सार्वत्रिक मोहिमेमध्ये संबंधीत संस्थेच्या परवानगीशिवाय लोगो वापरला तर तो आक्षेपार्ह ठरू शकतो. राज्य शासनाने हे पोस्टर मागे घ्यावे तसेच औषधाचा भाग प्रमाणीत आणि रजिस्टर्ड लोकांना हाताळू द्यावा. या मोहिमेसाठी आयएमए सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे या पत्रात म्हटले आहे. आयएमएचे राज्य संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ.अविनाथ भोंडवे व राज्य सचिव डॉ. पंकज बंदरकर यांनी ही भूमिका मांडली आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT